Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद- लंडन एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली

Ahmedabad-London Flight Canceled : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-159 ला तांत्रिक बिघाड आल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. हे विमान आज दुपारी १:१० वाजता लंडनकडे रवाना होणार होतं.
Air India
Passengers stranded at Ahmedabad airport as Air India flight AI-159 to London canceled due to a technical fault in Boeing 787 aircraft.Saam TV
Published On

AI-159 Ahmedabad London flight canceled due to technical fault : अहमदाबादहून लंडनला निघालेली एअर इंडियाची फ्लाईट तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज अहमदाबादहून लंडनसाठी विमानसेवा सुरू झाली होती. प्रवासी जीव मुठीत घेऊन विमानात बसले होते. पण विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे बोईंग विमान फ्लाईट क्रमांक एआय १५९ आज एक वाजून १० मिनिटांनी अहमदाबादवरून लंडनसाठी रवाना होणार होतं. पण विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फ्लाईट रद्द करण्यात आली आहे.

Air India
Jalgaon : धक्कादायक! जळगावात पोलिसावर गुन्हेगाराचा हल्ला, गाडी अंगावर घातली, संदीप पाटील थोडक्यात वाचले

काही दिवसांपूर्वी झालेल्या विमान अपघातानंतर आज पहिल्यांदाज अहमदाबादहून लंडनला एअर इंडियाचे विमान जाणार होते. पण विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा संशय आल्यामुळे रद्द करण्यात आले. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर असलेले फ्लाइट AI 159 दुपारी १:१० वाजता उड्डाण करणार होते. पण उड्डाणाच्या काही तास आधी बिघाड असल्याचे आढळल्याने रद्द करण्यात आले.

Air India
Emergency Landing : दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, १५७ प्रवाशांचा जीव धोक्यात

उड्डाण घेण्याआधी विमानाची तांत्रिक तपासणी केली जाते. त्यामध्येच या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आले. त्यामुळे मोठा धोका टळला अन् शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. पण ऐनवेळी फ्लाईट रद्द झाल्याने लंडनला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना विमानतळावर अडकून पडावे लागले.

Air India
Wedding Turns Tragic : लग्नाच्या आदल्या रात्रीच होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, नवरी प्रियकरासोबत झाली फरार

गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा अहमदाबाद-लंडन मार्गावरील एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बिघाड झाला आहे. यापूर्वी १४ जून रोजीही एक फ्लाइट रद्द झाली होती. सोमवारपासून पूर्वीचे फ्लाइट क्रमांक AI 171 बंद करण्यात आले. आता ही सेवा AI 159 म्हणून चालवली जात आहे. एअरलाइनने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. तरी सातत्याने होणाऱ्या या व्यत्ययांमुळे प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Air India
Mumbai : शेकडो मुलींचा लैंगिक छळ, न्यूड व्हिडिओ कॉल, नराधम मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com