संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Fake Insta IDs, AI tech used to force girls into nude video chats : दहिसर पोलिसांनी इन्स्टाग्रामवर महिला आणि मुलींशी मैत्री करून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या विकृत आरोपीला अटक केली आहे. आरोपी मनोज प्रसाद सिंग, हा AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले अश्लील फोटो वापरून मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याशी अश्लील संभाषण तसेच न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडायचा. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना १३,५०० हून अधिक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ आढळले. सध्या दहिसर पोलीस त्याचा तपास करत आहेत.
शेकडो मुलींच्या लैंगिक छळाच्या तक्रारींनंतर पोलिसांनी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सांदूर येथून मनोजला अटक केली. तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या मोबाइलच्या तपासणीत १३,००० हून अधिक मुलींचे फोटो आढळले. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास अधिकाऱ्यांना त्वरित तपासाच्या सूचना दिल्या.
दहीसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज इन्स्टाग्रामवर मुलींशी ओळख वाढवायचा आणि त्यांचे फोटो वापरून AI तंत्रज्ञानाद्वारे अश्लील छायाचित्रे तयार करायचा. या छायाचित्रांच्या आधारे तो मुलींना ब्लॅकमेल करायचा. एका १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. आरोपीने पीडित तरुणींच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून त्यावर अश्लील मजकूर आणि स्टोरीज पोस्ट करायचा, ज्यामुळे मुलींची बदनामी होत होती. मुलींनी नकार दिल्यास, तो त्यांच्याच बनावट खात्यांवरून अश्लील चित्रे आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करायचा.
पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून माहिती मागवली आणि आरोपीचा IP अॅड्रेस मिळवून त्याला कर्नाटकातून अटक केली. आरोपीने दिल्लीतून संगणकाचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. या ज्ञानाचा गैरवापर करून त्याने AI तंत्रज्ञानाद्वारे आकर्षक छायाचित्रे तयार करून मुलींना भुरळ पाडली आणि त्यांचे फोटो मागवून अश्लील छायाचित्रे तयार केली. त्याच्या मोबाइल गॅलरीत १३,५०० मुलींची छायाचित्रे आढळली. तपासात असेही समजले की, तो १०० हून अधिक मुलींशी इन्स्टाग्रामवर संवाद साधत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.