पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Kochi to Delhi IndiGo flight receives bomb threat, emergency landing in Nagpur : कोचीवरून दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्बची धमकी असल्याचे समजताच खळबळ उडाली. विमानात १५७ प्रवासी असल्याचे समजतेय. सर्वांना खाली उतरवून विमानाची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही चौकशी केली जात आहे.
कोची-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेने विमानतळावर आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विमानात १५७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स असून, सर्वांना सुरक्षितपणे उतरवण्त आले आहे. विमानातील बॉम्ब असल्याची धमकी मिळताच पायलटने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. विमान सुखरूप उतरले असले तरी, धमकीच्या गंभीर स्वरूपामुळे पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
याआधीही विमानात बॉम्ब असल्याची धमकी अनेकदा मिळाली आहे. पण अशा धमक्यांच्या घटनांमध्ये कोणताही ठोस पुरावा आढळला नव्हता, परंतु या प्रकरणात कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इतर विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवरही लक्ष ठेवले जात आहे. धमकीच्या मागील सत्यता आणि हेतू याबाबत तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येईल. सध्या सर्वांचे लक्ष पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाच्या तपासाकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.