Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये उलथापालथ, लष्करप्रमुखांसह कुटुंब गायब; सैन्यात फूट

pakistan Army Chief General Asim Munir: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान घाबरले आहे. पाकिस्तानच्या सैन्य दलात फूट पडली आहे. ५००० पेक्षा जास्त सैनिकांनी राजीनामे दिले. तर लष्करप्रमुखांसह कुटुंब गायब झाले आहेत.
Pakistan Asim Munir
pakistan army chief general asim munir Saam Tv
Published On

Army Chief and Families Missing: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली. आधी भारताला वारंवार धमकी देणारा पाकिस्तान भारतीय सैन्याच्या रोषाला आणि भारत सरकारने टाकलेल्या कठोर निर्बंधामुळे चांगलाच घाबरारला आहे. अनेक प्रमुख नेते आणि लष्करी अधिकाऱ्याचे कुटुंब देश सोडून पळून गेले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांचे कुटुंब आधी गायब झालं. आता ते स्वत:च गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्या बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत . दरम्यान काही अहवालांमध्ये असेही सांगितले जात आहे की, जनरल मुनीर रावळपिंडीतील एका बंकरमध्ये लपले आहेत. यानंतर #ResignAsimMunir देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे.

Pakistan Asim Munir
Pahalgam Attack: भारताकडून पाकड्यांची आर्थिक कोंडी; पाकिस्तानच्या मूळावर घाव

असे सांगितले जात आहे की, जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या कुटुंबाला परदेशात पाठवले आहे. भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानी लष्करातील इतर अनेक अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवले आहे. त्यापैकी काही जण खासगी विमानांनी ब्रिटन आणि न्यू जर्सीमधील सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. लष्करप्रमुखांचे कुटुंब गायब झाल्यानंतर आता ते देखील गायब झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या बैसरन खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव तीव्र झाला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे संकेत मिळाल्याने, भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचे पाऊल उचलले. हा करार दोन्ही राष्ट्रांमधील चार युद्धांपासून वाचला होता. पाकिस्तानने या निर्णयाला बेकायदेशीर म्हणत करार स्थगित करण्याला विरोध केला आहे.

Pakistan Asim Munir
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ झेंड्यावर पाय ठेवून आणि थुंकून अनोखे आंदोलन|VIDEO

अशामध्ये पाकिस्तानी सैन्यात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली असून बंडखोरीची परिस्थिती आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड दबाव येत आहे. तसंच, लष्करी कमांडर्सकडून वारंवार बदलणारे आदेश, मानसिक थकवा आणि कौटुंबिक दबाव यामुळे १०० हून अधिक लष्करी अधिकारी आणि ५०० हून अधिक सैनिकांनी राजीनामा दिला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे.

Pakistan Asim Munir
Pahalgam Terror Attack: जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा हल्ला; स्थानिक नागरिक दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, घरात घुसून झाडल्या गोळ्या

अशी देखील सांगितले जात आहे की, भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तराच्या भीतीने सुमारे ५,००० पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिकांनी अवघ्या दोन दिवसांत राजीनामा दिला आहे. अनेक सैनिकांचे कुटुंब त्यांना भारताच्या हल्ल्याच्या भीतीने काम सोडण्याचे आवाहन करत आहेत. तर काही सैनिक स्वतः त्यांच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे राजीनामा देत आहेत. तसंच, अनेक सैनिक आधीच घरी गेले आहेत आणि आणखी बरेच जण लवकरच राजीनामा देण्याचा प्लान आखत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ११ व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुखारी यांनी लष्कराच्या मुख्यालयाला पत्र लिहून या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

Pakistan Asim Munir
Pahalgam Attack: दहशतवाद्यांची आता खैर नाही! सुरक्षा दल अ‍ॅक्शन मोडमध्ये, १० दहशतवाद्यांची घरं बॉम्बने उडवली| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com