Rahul Gandhi : 'जम्मू-काश्मीर हा भारताचा...'; श्रीनगरमधील पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi Condemns Pahalgam Terror Attack: राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमीची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांना आणि नेत्यांना भेटले आणि दहशतवादाविरुद्ध राष्ट्रीय एकतेवर भर दिला.
Rahul Gandhi Condemns Pahalgam Terror Attack
Rahul Gandhigoogle
Published On

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर भाष्य केले आहे. नुकतेच राहुल गांधींनी दहशतवादी हल्ल्यात दगावलेल्या पिडीतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्याचसोबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमेद अब्दुल्ला यांची सुद्धा भेट घेतली आहे. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'सगळा भारत एकत्र आहे. तसेच सगळ्या पक्षांनी सुद्धा एकजुटपणा दाखवला आहे.

Rahul Gandhi Condemns Pahalgam Terror Attack
Holiday Summer: कर्जत सोडा; मुंबईपासून काही तासाच्या अंतरावरच पाहा निसर्गरम्य ठिकाणं

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी श्रीनगर येथे असलेल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले, ''जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. सर्व भारतीय नागरिक एकत्र आहेत. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या निष्पाप लोकांच्या कुटुंबांशी मी संवाद साधला आहे. त्यांच्यासोबत संपूर्ण भारत आहे. तसेच सगळ्यांना एकत्र राहून दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. मी एका जखमी व्यक्तीला भेटलो आहे. माझे प्रेम आणि साथ त्यांच्यासोबत कायम असेल. ज्यांनी परिवारातील सदस्य गमावलेत त्यांच्यासोबत संपूर्ण भारत आहे.''

राहुल गांधीचा सरकारला पाठिंबा

राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीबाबत म्हणाले की, ''गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये संयुक्त पक्षाने निषेध केला आणि सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असेही ते म्हणाले. सध्या जे काही समाजात फूट पाडण्यासाठी घडले, त्यावर आपण बंधू-भावाने एकत्र राहणे गरजेचे आहे. तसेच दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकजूट राहणे खूप महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

भारतीयांना एकत्र राहण्याची गरज आहे - काँग्रेसचे खासदार

काँग्रेसचे खासदार पहलगाम हल्ल्याच्या घटनेवर भारतीयांशी संवाद साधताना सगळ्यांनी एकत्र राहून दहशतवाद्यांचे प्रयत्न अशस्वी करायचे आहेत. पुढे म्हणाले, ''पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये जे माझे भारतीय बांधव दगावले त्यांबद्दल मी अत्यंत दु:खी आहे. मात्र आता एकत्र येऊन दहशतवाद्यांना हरवणं हे एक मुख्य धैर्य ठेवले पाहीजे. तर मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांच्या बैठकीत त्यांनी मला सगळी माहिती दिली आहे. त्यावर पुढे मी त्यांना संपुर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

Rahul Gandhi Condemns Pahalgam Terror Attack
Latest Army Series 2025: हे पाहण्याजोगं..., आर्मीवर आधारित TOP 10 इंडियन वेब सिरीजची यादी, एकदा वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com