Saam Tv
फिरायला जायचा प्लान करताना पुणे हे शहर नेहमीच पहिला ऑपशन असतो.
पुण्यातल्या फेमस ठिकाणी तुम्ही कमी वेळात मनसोक्त फिरू शकता.
पुढे आम्ही तुम्हाला मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या ट्रेकिंगसाठी आणि अॅडव्हेंचरसाठी फिरण्याच्या प्रसिद्ध ठिकाणांची माहिती देणार आहोत.
मुंबईपासून पुण्यात प्रवेश करताना वाटेत लागणारे ठिकाण म्हणजे लोणावळा आहे.
लोणावळ्यात तुम्ही लोहगड किल्ला, राजमाची पॉइंट, भुशी धरण आणि कुणे धबधब्यांना भेट देऊ शकता.
सुंदर झाडी, डोंगर दऱ्या आणि थंडगार वातावरण पाहण्यासाठी तुम्ही पाचगणीला भेट देऊ शकता.
पाचगणीत तुम्हाला कास पठार, माप्रो गार्डन आणि टेबल लॅंड अशी ठिकाणे पाहता येऊ शकतात.
इगतपुरी हे ठिकाण एक सुंदर आणि निसर्गाने वेढलेलं हिल स्टेशन आहे.
रॅपलिंग, लॅडर ब्रिज आणि सायकलिंग अशी भन्नाट मज्जा करण्यासाठी तुम्ही विक्रमगड पाहण्याचा प्लान करू शकता.