Saam Tv
उन्हाळ्यात ac ला प्रचंड महत्वाचे स्थान दिले जाते.
उन्हाळ्यात AC चा वापर जास्त प्रमाणात आपण करतो. मात्र अचानक ac बिघडली आणि कुलिंग होणं थांबलं तर घाबरू नका.
तुम्ही घरच्या घरी टेक्निशियन शिवाय ac दुरुस्त करू शकता. कसे ते पुढील सोप्या मुद्यांद्वारे समजून घ्या.
थर्मोस्टॅटच्या सेटिंग्जमध्ये जावून तो 'cool' मोडवर आहे का तपासा आणि खोलीच्या तापमानापेक्षा कमी ठेवा.
एअर फिल्टर स्वच्छ धुवून घ्या. त्यावर धुळ असल्याने थंड हवा येणं बंद होतं.
आउटडोर युनिटवरील धूळ किंवा साचलेली घाण काढून टाका. युनिटजवळ स्वच्छता ठेवा.
एसी चालू करण्यापुर्वी दारं खिडक्या बंद करा. त्याने बाहेरील गरम हवा आत येऊ शकते.
एसीच्या पाईपवर बर्फ दिसत असेल तर एसी त्वरित बंद करा.
एसी लावल्यावर लाईट बंद करा, पडदे लावून घ्या तसेच घरात जेवण करताना एसी लावू नका. त्याने एसी कुलिंग करणं बंद होऊ शकतं.