भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

AAP Wins 903 Wards In Punjab Municipal Elections: पंजाबमधील नगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय झाला असून 903 जागांवर विजय मिळवला आहे.
AAP supporters celebrate a massive victory after winning 903 wards in Punjab municipal elections.
AAP supporters celebrate a massive victory after winning 903 wards in Punjab municipal elections.saam tv
Published On

पंजाबमधील नगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले असून आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली स्थिति अधिक मजबूत केली आहे. आता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आप पक्षाने 903 वार्डांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने 362 वॉर्डांमध्ये विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. तर 247 वॉर्डांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. शिरोमणी अकाली दलाला 183 वार्डांमध्ये यश मिळाले असून भाजपने फक्त 162 जागा जिंकल्या आहेत. तर बहुजन समाज पक्षाला अवघ्या 7 जागा मिळाल्या आहेत.

AAP supporters celebrate a massive victory after winning 903 wards in Punjab municipal elections.
कर्नाटकातील राजकारणात अचानक ट्विस्ट; डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढला

आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच सर्व राजकीय पक्षांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष,पारदर्शक आणि सुरक्षित राहावी यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या. आयोगाच्या नियोजनानानुसार प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली.

काही दिवसांपूर्वीच भाजपने ऑपरेशन लोटस राबवत आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांच्यासह 6 खासदारांना भाजपमध्ये घेत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिला होता. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीत यावर परिणाम होईल असे बोलले जात असताना याचा कुठलाही प्रभाव या निवडणुकीवर पडले नाही तर भाजपलाच मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

AAP supporters celebrate a massive victory after winning 903 wards in Punjab municipal elections.
एकीकडे 47°C उष्णतेचा तडाखा, दुसरीकडे मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं|VIDEO

2027 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी भाजपने आम आदमी पक्षातील अनेक नेत्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली असतानाच पंजाबच्या नागरिकांनी या सगळ्याला कुठेतरी मतपेटीतून उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने भाजपला आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com