Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर

Maharashtra Bypolls: महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवळा आणि पेठ नगरपंचायतीसाठी २० जूनला पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर
Maharashtra Election Saam Tv
Published On
  • महाराष्ट्र नगरपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  • मनमाड, देवळा, पेठ नगरपंचायतीसाठी २० जूनला पोट निवडणूक

  • राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजले. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवळा आणि पेठ नगरपंचायतीसाठी २० जूनला पोट निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीच्या तयारीची बैठक घेतली. २३ जुलैला काय निकाल येतो? त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. २३ जुलैच्या निकालावर जिल्हा परिषद निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, '२०२५ मध्ये नगर पंचायत निवडणुका झाल्या. ज्या ठिकाणी सदस्य नॉमिनेशननंतर निधन झाले किंवा अन्य काही कारणास्तव पद रिक्त झाले. राज्यात अशा २९ पदांसाठी पोट निवडणूक आहे. मनमाडमधील २, पेठ मधील १ आणि देवळामधील १ अशा ४ जागांसाठी पोट निवडणुका आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर
MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; ८ दिवसांत १७ जागांवर निवडणुका लागण्याची शक्यता

दिनेश वाघमारे यांनी पोटनिवडणुकीच्या तयारीबाबत सांगितले की, 'पोलिंग २० तारखेला होणार आहे. मतदार यादी १ जुलैची वापरणार आहोत. मतमोजणी केंद्रांची तयारी झाली आहे. कर्मचारी वर्ग, मतदान यंत्र व्यवस्थित आहेत. निवडणुकीची जय्यत तयारी झालेली आहे. या पोट निवडणुकीत लोकसभा, विधानसभाप्रमाणेच तीच प्रक्रिया असणार आहे. मतदार यादीत ४ गट केले जातील. पहिल्या नंबरला राज्य मान्यता प्राप्त पक्षांचे चिन्ह असणार आहे. तर शेवटी अपक्षांचे चिन्ह असेल.'

Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर
MLC Election : अमरावतीत विधान परिषद निवडणुका; भाजपकडून 'या' नावावर जवळपास शिक्कामोर्तब, मविआकडून कोण?

तसंच, 'जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या होत्या. २३ जुलै रोजी निकाल काय येतो त्यानंतर निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एसआयआ नंतर घ्यावा, अशी काही मागणी आमच्याकडे आलेली नाही. एसआयआर प्रक्रिया जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. मॅपिंगची प्रक्रिया सुरू आहे.', असे दिनेश वाघमारे म्हणाले.

Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर
MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत ठिणगी; शिंदेसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com