MLC Election : अमरावतीत विधान परिषद निवडणुका; भाजपकडून 'या' नावावर जवळपास शिक्कामोर्तब, मविआकडून कोण?

Amravati Vidhan Parishad Election Update : अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून प्रवीण पोटे-पाटील तर काँग्रेसकडून अनिल अग्रवाल यांच्या नावाची चर्चा असून ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
AMRAVATI MLC ELECTION 2026: BJP VS CONGRESS BIG FIGHT LIKELY
AMRAVATI MLC ELECTION 2026: BJP VS CONGRESS BIG FIGHT LIKELYAI Image
Published On
Summary
  • अमरावती विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढतीची शक्यता

  • १८ जून मतदान, २२ जून निकाल

  • दोन वर्षांपासून रिक्त असलेली जागा पुन्हा चर्चेत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश असून, महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या अनिल अग्रवाल यांचे नाव चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या मतदारसंघातून कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तब्बल दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या अमरावतीच्या जागेसाठी ही निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

AMRAVATI MLC ELECTION 2026: BJP VS CONGRESS BIG FIGHT LIKELY
Electricity Saving Tips : उन्हाळ्यात सतत AC चालवला तरी वीजबिल येईल कमी? वापरा या ट्रिक्स

अमरावती विधान परिषद मतदारसंघाचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपला होता. या मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे-पाटील यांनी २०१२ ते २०२४ या कालावधीत सलग प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाही भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांतर्गत पातळीवरही त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असल्याची चर्चा आहे.

AMRAVATI MLC ELECTION 2026: BJP VS CONGRESS BIG FIGHT LIKELY
Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेसकडून अनिल अग्रवाल यांचे नाव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, शहरातील एका नामांकित वृत्तपत्राचे संपादक व मालक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी मागील काही वर्षांपासून विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. यामुळे अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे-पाटील आणि काँग्रेसचे अनिल अग्रवाल यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com