Alisha Khedekar
खूप कमी तापमान ठेवल्यास वीज जास्त खर्च होते. २४°C वर एसी चालवल्यास थंडावा मिळतो आणि विजेची बचतही होते.
सीलिंग फॅनमुळे थंड हवा लवकर पसरते. त्यामुळे खोली पटकन थंड होते आणि एसीवरचा ताण कमी होऊन बिल कमी येते.
एसी चालू असताना दरवाजे-खिडक्या बंद ठेवा. बाहेरील गरम हवा आत येऊ नये, यामुळे थंडावा टिकतो आणि वीज वाचते.
सूर्यप्रकाश थेट आत येत असेल तर जाड पडदे लावा. त्यामुळे उष्णता कमी होते आणि एसीला कमी काम करावे लागते.
दर १५-३० दिवसांनी फिल्टर साफ करा. धूळ साचल्याने एसी जास्त वीज वापरतो, स्वच्छ फिल्टरमुळे कार्यक्षमता वाढते.
रात्री स्लीप मोड वापरल्यास एसी तापमान आपोआप नियंत्रित करतो. यामुळे अनावश्यक वीज वापर टाळला जातो आणि बिल कमी येते.
झोपताना एसी टायमर लावा. काही तासांनी एसी बंद झाल्यास वीज वाचते आणि खोली थंड राहते.
नवीन एसी घेताना ५-स्टार इन्व्हर्टर मॉडेल निवडा. हे कमी वीज वापरतात आणि दीर्घकाळात खर्चात मोठी बचत करतात.