

DK Shivakumar Updates : काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यात डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानं अचानक ट्विस्ट आला आहे. नव्या कॅबिनेटबद्दल अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही. शनिवारी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असे शिवकुमार म्हणाले.
कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. बैठकांच्या सत्रानंतर अखेर या सत्तानाट्यावर पडदा पडला. काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. डी.के.शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असे जवळपास निश्चित मानले जात आहे. पण दिल्लीत शिवकुमार यांनी याबाबत वक्तव्य केल्यानं सस्पेन्स वाढला आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशांनुसार सर्व कामे सुरू आहेत. सध्या तरी चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या आमदारांना बेंगळुरूत थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे शिवकुमार म्हणाले.
दिल्लीत शुक्रवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात सिद्धारामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. नव्या सरकारची स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार, संघटनेशी संबंधित महत्वाचे मुद्दे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत राज्यसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत समतोल राखण्याबाबतच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.
सोशल मीडियावर डीके शिवकुमार यांनी सिद्धारामय्या यांच्याबद्दल भावुक पोस्ट केली. सिद्धारामय्या यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, मेहनत आणि सामाजिक न्यायाप्रतीचं समर्पण आदर्शव्रत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ईश्वर एखाद्याला वरदान किंवा शाप देत नाही, तर सधी देतो. मनुष्य त्या संधीचा उपयोग कसा करतो हे पाहणे महत्वाचे असते. सिद्धारामय्या यांच्या संपूर्ण आयुष्यातून हेच सिद्ध झाले आहे. सिद्धारामय्या यांनी म्हैसूरच्या एका छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू केला. ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर निरंतरपणे काम करण्याची भावना आहे, असेही शिवकुमार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.