सिद्धरामय्यांचा राजीनामा; कर्नाटकातील नेतृत्वबदलाची इनसाईड स्टोरी काय? VIDEO

karnataka politics : गेल्या वर्षभरापासून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष सुरू होता. आता सिद्धरामय्यांना का पायउतार व्हावं लागलंय? आणि कर्नाटकातील नेतृत्वबदलाची इनसाईड स्टोरी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
karnataka news
karnataka politicsSaam tv
Published On

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची वर्णी लागणार आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, आता डीके शिवकुमार यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. इतकंच नव्हे तर शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात प्रियांका गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा सुरू झालीये.

karnataka news
मुख्यमंत्री बदलाची हालचाल सुरू, दुसरीकडे राज्यपाल 'आऊट ऑफ टाऊन'; राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या कराराचे पालन करून डीके शिवकुमार यांनाच मुख्यमंत्री बनवायचे की दुसऱ्या चेहऱ्याचा विचार करायचा, यावर दिल्लीत खलबतं सुरू होती. यावेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपला निर्णय कायम ठेवला. प्रियांका गांधींनी सल्ला दिला की, या पदासाठी केवळ डीके शिवकुमार यांचीच निवड करण्यात यावी, दुसऱ्या कोणत्याही नावाचा विचार केला जाऊ नये. प्रियांका गांधींच्या या स्पष्ट भूमिकेमुळेच अखेर सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागल्याची चर्चा रंगलीये.

karnataka news
मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, प्रियांका गांधींशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यादेखील कर्नाटकात नेतृत्वबदलासाठी आग्रही होत्या. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत स्वतंत्र आणि संयुक्त बैठका घेऊन पक्षातील अंतर्गत एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे, ज्यांच्यासाठी प्रियांका गांधींनी अट्टहास धरला त्या डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात पुढील काळात कर्नाटक काँग्रेसची वाटचाल कशी राहते, हे पाहणं महत्त्वाचं असेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com