राघव चड्ढानंतर अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका; बड्या नेत्याचा आम आदमी पक्ष सोडला!

sagar rabari resigns from aap after raghav chadha exit : आम आदमी पक्षात सध्या नाराजीनाम्याचं सत्र सुरू आहे. राज्यसभेतील सात खासदारांनी 'आप'ला सोडचिठ्ठी देत भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एका नेत्यानं पक्षाला रामराम केला आहे. हा केजरीवालांना मोठा झटका मानला जात आहे.
राघव चढ्ढांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा आम आदमी पक्षाला रामराम, निवडणुकांच्या तोंडावरच राजीनामा
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या आणखी एका नेत्यानं राजीनामा दिलाsaam tv
Published On

खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासह सात खासदारांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राजकीय संकटात सापडला आहे. त्यात आता आणखी एका बड्या नेत्याने पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष आणि शेतकरी नेते सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. हा केजरीवाल यांना मोठा झटका आहे, असे मानले जात आहे.

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi party) गुजरात उपाध्यक्ष आणि शेतकरी नेते सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाहीर केले आहे. मागील आठवड्यातच आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. यामध्ये राघव चढ्ढा, स्वाती मालिवाल, विक्रम साहनी, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक आणि राजिंदर गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे. हरभजनने याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हा झटका पचत नाही तोच आता सागर रबारी यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. गुजरातमध्ये पुढील वर्षी अखेरीस निवडणूक होणार आहे. तसेच केजरीवाल हे गुजरातमध्ये पक्षविस्ताराचे प्रयत्न करत आहेत. अशा वेळी रबारी यांनी पक्ष सोडणे हा केजरीवालांच्या पक्षविस्ताराच्या धोरणाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

सागर रबारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध केली आहे. आज मी आम आदमी पक्षासोबतचा प्रवास थांबवत आहे. पक्षाचे सदस्यत्व, पद आणि जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त करत आहे. सहकार्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. वैयक्तिक नाते आणि मैत्री ही पुढेही कायम राहील, असे रबारी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रबारी यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर वैचारिकदृष्ट्या आम्ही सुरुवातीपासूनच भाजपच्या विरोधात आहोत. माझ्यावर काही आरोपही नाहीत आणि कोणत्याही व्यावसायिक हितामुळं माझ्यावर कुणीही दबाव टाकू शकत नाही. पक्षाचे काही नुकसान होऊ नये म्हणून मतदानानंतर राजीनामा दिला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, गुजरातमध्ये २६ एप्रिल रोजी पालिका निवडणुकांसाठी मतदान झाले होते.

कोण आहेत सागर रबारी? (Who is Sagar Rabari)

सागर रबारी हे गुजरातमधील किसान एकता मंचाचे संस्थापक आहेत. ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील पक्षाच्या मुख्यालयात इसुदान गढवी आणि किशोर देसाई यांसह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला होता. रबारी यांना प्रदेश उपाध्यक्षपद दिले होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी निभावली होती. त्यावेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. पण आम आदमी पक्षाचे पाच आमदार निवडून आले होते.

राघव चढ्ढांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा आम आदमी पक्षाला रामराम, निवडणुकांच्या तोंडावरच राजीनामा
राघव चड्ढांनी 'आप' सोडून भाजप का निवडला? त्यांच्याकडे कोणते ३ पर्याय होते? स्वतःच सांगितली इनसाइड स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com