Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Navi Mumbai News: नवी मुंबईत भयंकर घटना घडली. कॉलेजच्या विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून फेकून देण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Mumbai Local Saam Tv
Published On

Summary:

  • धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं

  • पनवेल–खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

  • महिला डब्यात चढलेल्या व्यक्तीचे भयंकर कृत्य

  • घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

विकास मिरगणे, नवी मुंबई

धावत्या लोकलमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल- खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. महिलांच्या डब्यामध्ये चढललेल्या व्यक्तीला हटकल्यामुळे त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. महिला डब्यात घुसखोरी केलेल्या एका विकृताने तरुणीला धावत्या लोकलमधून फेकून दिलं. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडली त्यावेळी महिला डब्यातील सर्वजण घाबरले. काहींनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. त्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Mumbai Local: गुड न्यूज! मुंबईत धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल, केंद्र सरकराचा जबरदस्त प्लान

पनवेल येथे राहणारी विद्यार्थीनी ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. यावेळी महिला डब्यात शेख अख्तर नवाज शेख चढला. त्याला डब्यातील महिलांनी जाब विचारत हा महिला डबा आहे खाली उतर असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेताला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले. हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तत्काळ लोकलची चेन खेचली.

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Mumbai Local : मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, महिलेकडे पाहून अश्लील चाळे, पुढे काय झाले...

काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. लोकल स्थानकावर दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेखला अटक केली. या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कंबरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com