संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही मराठी, कल्याण
Mumbai Local Shocking Incident News : सीएसटीवरून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली असून, या कृत्यावर लोकलमधील प्रवासी संतापले. घटना अंबरनाथ लोकलमधील असून, तरुणांचे वागणे पाहून महिला प्रवाशांनी विरोध दर्शविला. लोकल उल्हासनगर स्थानकात पोहोचताच संतप्त प्रवाशांनी दोघांना खाली उतरवून चोप दिला आणि त्यांना ताब्यात घेतले.
महिलेकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्यांना प्रवाशांनी चोप दिला. त्यानंतर प्रवाशांनी दोन्ही तरुणांना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. उल्हासनगर स्थानकातून कल्याण जीआरपीकडे दोघांना हस्तांतरित करण्यात आले आहे. जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर महिला प्रवाशांनी अशा प्रकारच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन आणि जीआरपीने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये दोन जणांनी एका महिलेकडे पाहून अश्लील चाळे केले. त्यामुळे लोकलच्या बोगीत असणाऱ्या प्रवाशांचा संताप अनावर झाला. अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पाहून प्रवासी संतप्त झाले. प्रवाशांनी त्याला लोकलमध्येच पकडून चोप देण्यास सुरवात केली. यावेळेस काही महिलांनी देखील या व्यक्तीला चोपलं. या घटेनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारानंतर मुंबई लोकलमध्ये महिला सुरक्षित आहेत की नाहीत? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी चोप दिल्यानंतर दोन्ही नराधम माफी मागून गयावया करू लागले. मात्र या नराधमला प्रवाशांनी कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोकलमधील प्रवाशांनी विकृताला चोप देतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.