Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

Yashasvi Jaiswal Hospitalized: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीग सामन्यादरम्यान भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली. सामना संपल्यानंतर गंभीर स्थिती झाल्यानंतर त्याला उपचारांसाठी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Yashasvi Jaiswal Hospitalised:
Yashasvi Jaiswal during the Syed Mushtaq Ali Trophy match before being taken to hospital due to sudden illness.saam tv
Published On
Summary
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली.

  • राजस्थान विरुद्ध मुंबई सुपर लीग सामना सुरू असतानाच पोटाचा त्रास जाणवला.

  • सामन्यानंतर त्रास वाढल्याने यशस्वीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली. मंगळवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) च्या सुपर लीग सामन्यात राजस्थान विरुद्ध मुंबईचा सामना सुरू होता. हा सामना खेळताना यशस्वीला पोटात त्रास होऊ लागला. सामन्यानंतर त्याचा त्रास वाढल्या. त्यानंतर त्याला पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या यशस्वीची तब्येतबाबत एक नवीन अपडेट समोर आलीय. जैस्वालला काय त्रास होत आहे. कोणत्या आजारामुळे जैयस्वालच्या पोटाला त्रास होतोय ते जाणून घेऊ.

पु्ण्यातील एमसीए स्टेडियमवर मुंबई आणि राजस्थानदरम्यान क्रिकेट सामना होत होता. त्यावेळी मुंबईनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान यशस्वी जैयस्वाल ओपनिग करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळीच त्याला पोटाचा त्रास होत होता. तरीही तो मैदानात धावत फलंदाजी करत होता. त्याने अंजिक्य रहाणे सोबत फलंदाजी करताना त्याने ४२ धावांची भागीदारी केली. दरम्यान यशस्वी १६ धावा करून बाद झाला.

डाव संपल्यानंतर यशस्वीच्या पोटाचा त्रास अधिक वाढू लागला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशस्वीला पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तिथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या एका टीमने त्यांची तपासणी केली. अल्ट्रासाऊंड (यूएसजी) आणि सीटी स्कॅन करण्यात आले. या चाचण्यांमध्ये पोटातील आतड्यांमध्ये सूज आल्याचं दिसून आले. त्यानंतर शरीरात डिहायड्रेशन होऊ नये आणि वेदना कमी व्हाव्यात म्हणून डॉक्टरांनी त्याला औषधे दिली आहेत.

हा आजार काय आहे आणि तो का होतो?

यशस्वीला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस नावाच्या आजाराने ग्रासले असल्याची माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अमित शर्मा यांनी दिली. हा एक सामान्य पोटाचा संसर्ग आहे, ज्याला अनेकदा उलट्या आणि अतिसार होण्याची समस्या असं म्हटलं जातं. सध्या, यशस्वीची प्रकृती स्थिर आहे, असेही डॉक्टर म्हणालेत. हा आजार सहसा विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे होतो. काही दिवसांतच बरा होत असतो. पण खेळाडूंमध्ये अशा समस्या लवकर गंभीर होऊ शकतात. त्यांचे शरीर अधिक काम करत असते. त्यामुळे रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचं डॉक्टर अमित शर्मा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com