संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: टिटवळा परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एनसीबी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त केला आहे. या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या भाड्याच्या घरातून सुमारे २ किलो ३०० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. यामध्ये एमडीएमए आणि एमडी बटन या प्रकारांचा समावेश आहे. शनिवारी उशिरा रात्री पद्मावती सोसायटी येथे छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईचा धागा १५ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या एका वेगळ्या ड्रग्स प्रकरणाशी जोडला गेला आहे. त्या प्रकरणातील आरोपीच्या चौकशीतून या महिलेचे नाव समोर आले होते. ती ड्रग्स पुरवठा साखळीतील महत्त्वाची कडी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी आणि कल्याण तालुका पोलिसांनी सापळा रचत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि छापा टाकत तिला अटक केली. या अचानक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली महिला मूळची नवी मुंबई येथील असून ती गेल्या दीड महिन्यापासून टिटवळ्यात भाड्याने राहत होती. या कालावधीत ती स्थानिक पातळीवर ड्रग्स वितरणात सक्रिय होती का?याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी एनसीबीने तपास अधिक व्यापक केला असून, मुंबई आणि ठाणे परिसरातील ड्रग्स नेटवर्कला या कारवाईमुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.