पुण्यात ड्रग्स सेवन करणारे 300 पेक्षा अधिक जण पुणे पोलिसांच्या रडावर|VIDEO

Pune Police Action Against Mephedrone Users: पुण्यात मेफेड्रोन प्रकरणात 300 हून अधिक नशेखोर पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आयटी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिकांसह अनेकांची चौकशी सुरू असून गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

मेफेड्रोनची नशा करण्याऱ्या अनेक तरुणांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. ड्रग्स पेडलर सह ड्रग्स सेवन करणारे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात नशेखोरांची झाडाझडती घेण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी झाडाझडती घेतली. यामध्ये उपसरपंच, बांधकाम व्याव्सायिक, रिक्षा चालक , आयटी कर्मचारी, विद्यार्थी , महिला, औषध विक्रेते अश्या व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांचे नातेवाईक मित्र, पूर्ण पत्ता आणि या आधी गुन्ह्याची माहिती भरून घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात उत्तमनगर पोलिसांनी सराईत मेफेड्रोन ची विक्री करणाऱ्याला अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com