Crime News : मामाचा १७ वर्षांच्या भाचीवर बलात्कार; मुलीमध्ये बदल जाणवू लागताच संशय आला, आपबीती ऐकून आई हादरली

Minor assault: लखनऊच्या गोमतीनगरमध्ये १७ वर्षीय मुलीवर मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भधारणेनंतर प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास सुरू आहे.
Crime
Crime Saam TV
Published On

लखनऊच्या गोमतीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोमतीनगरमधील मोठी जुगौली भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर तिच्याच मामाने अत्याचार केला. मुलगी नेहमीच मामाच्या घरी ये-जा करत होती. याच विश्वासाचा फायदा घेत घेत आरोपीने तिच्यासोबत हे चुकीचं कृत्य केलं आहे.

जीवे मारण्याची धमकी

दरम्यान अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीमुळे ती बराच काळ गप्प राहिली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

गर्भधारणेमुळे उघडकीस आला प्रकार

गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला ज्यावेळी १७ वर्षांची मुलगी गर्भवती राहिली. तिचे शरीरात झालेले बदल पाहून कुटुंबीयांनी चौकशी केली. यावेळी तिने धैर्य दाखवत तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीने स्पष्ट केलं की, मामाने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केले होते.

पीडितेची आई न्याय मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता परिस्थिती आणखी बिघडली. आरोपीच्या आईने मुलाला पाठीशी घालत पीडितेच्या आईशी उर्मट वर्तन केलं. इतकंच नाही तर त्यांनी शिवीगाळ करून याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकीही दिली.

पोलिसांनी केली कारवाई

मुलीच्या तक्रारीनंतर गोमतीनगर पोलिसांनी त्वरित हालचाल केली. इंस्पेक्टर बृजेश चंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला जुगौली रेल्वे क्रॉसिंगजवळून अटक केली. यावेळी त्याच्यावर जीव मारण्याची धमकी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. दुसरीकडे पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com