mumbai local News
mumbai local Saam tv

Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

local train Dispute news : तिकीटावरून लोकलमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झला. या वादानंतर झालेल्या संतापातून तरुणाने रेल्वे कार्यालयाची तोडफोड केली.
Published on

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai : मुंबईच्या विरार लोकल रेल्वेत पुन्हा एकदा तिकीट तपासणीवरून वाद निर्माण झाला. विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशाचा तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद झाला. यानंतर त्याने तिकीट तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला करत सरकारी संपत्तीची देखील तोडफोड केली.

नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या दादर ते बोरीवली दरम्यान पहिल्या वर्गाच्या डब्यात तिघे प्रवासी दुसऱ्या वर्गाचे तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यापैकी एकाकडे अंधेरी ते बोरीवलीदरम्यान तिकीटही नव्हते. तपासणीकर्ता उपमुख्य तिकीट तपासनीस शमशेर इब्राहिम यांनी ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तिघांनाही बोरीवली स्थानकावर उतरवले.

mumbai local News
Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

पुढील कार्यवाहीसाठी TTE/TC कार्यालयात नेल्यावर एका प्रवाशाचा संताप अनावर झाला. तिकीट तपासणीवरून झालेल्या वादातून त्याने कार्यालयातील संगणकाचा सीपीयू आणि इतर साहित्याची तोडफोड केली. वाद इतका वाढला की, त्यात प्रवासी आणि एक रेल्वे कर्मचारी जखमी झाले.

mumbai local News
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

अमरावतीत महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हाणामारी

अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी झाली. ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्री स्टाइल हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. या जागेचा नमुना आठ अ फेरफारच्या वादावरून ही हाणामारी झाल्याचे समजते.. या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com