Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Donald Trump News : भारताने रशियासोबतशी व्यापार सुरु ठेवला आहे. भारताचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका मानला जात आहे.
Donald Trump news
US President Donald Trump Saamtv
Published On

अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू केल्याने भारतीय व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारत आणि रशियातील व्यापार करारामुळे अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लागू केल्याचं बोललं जात आहेत. अमेरिकेच्या निर्णयानंतरही भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. भारताचा हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात होता. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या करारामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी दर्शवल्याचंही बोललं जात होतं. 'एएनआय' सूत्रांनी तेल खरेदीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Donald Trump news
Shocking : राज्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर गोळीबार, परिसर हादरला

मीडिया रिपोर्टनुसार, 'भारताने रशियाच्या तेल रिफायनरींकडून खरेदी सुरुच ठेवली आहे. जागतिक व्यापाराचा निर्णय हा किंमत, कच्च्या तेलाची गुणवत्ता, साठवण आणि इतर आर्थिक घटकांवर आधारित घेतला जातो.

Donald Trump news
Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

रशिया जगातील दुसरा कच्चा तेलाचा उत्पादक

रशिया जगातील दुसरा मोठा कच्चा तेलाचा उत्पादक देश आहे. रशिया दिवसाला ९.५ मिलियन बॅरल तेलाचा उत्पादन करतो. तसेच जगात दुसरा सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश आहे. जवळपास दिवसाला ४.५ मिलियन बॅरल कच्चा तेलाची निर्यात केली जाते.

Donald Trump news
Corruption Story : क्लर्कचा पगार १५००० रुपये; घरात सापडलं ३० कोटींचं घबाड

मीडिया रिपोर्टनुसार, रशियाच्या तेल खरेदीवर कधीही बंदी घातली नव्हती. तर ते G7/EU किमतीच्या मर्यादा यंत्रणेखाली ठेवण्यात आले होते. व्यवहार सुरु ठेवून भारताने एक जबाबदार जागतिक ऊर्जा भागीदार म्हणून भूमिका बजावल्याचे बोललं जात आहे. यामुळे बाजारातील तेलाच्या किंमती स्थिर राहतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताची खरेदी पूर्णपणे वैध असून आंतरराष्ट्रीय निकषांच्या मर्यादेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com