
कर्नाटकातून एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलंय
एका निवृक्त क्लर्कने कोट्यवधींची माया जमवली होती.
क्लर्कच्या नावावर २४ घरे आणि ४० एकर जमीन होती.
कर्नाटकातून भ्रष्टाचाराचं हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील सरकारी क्लर्ककडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. या क्लर्कला महिन्याला १५००० रुपये पगार होता. या क्लर्कच्या घरी छापा टाकल्यानंतर कोट्यवधींचं घबाड सापडलं.
क्लर्क हा सरकारच्या कोप्पलमधील ग्रामीण पायाभूत सुविधा विकास मर्यादित या सरकारी कंपनीत कार्यरत होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो महिना १५ हजार रुपये पगारांवर कार्यरत होता. मात्र त्याने मागील काही वर्षांत कोट्यवधींची माया जमवली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त क्लर्कच्या घरात छापा मारण्यात आला. त्यानंतर त्याच्याजवळ ४० एकर जमीन, २४ घरे आणि ४ प्लॉट्स असल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याजवळील सोने आणि चांदी देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याजवळील संपूर्ण संपत्ती त्याची पत्नी, भाऊ आणि त्याच्या नावावर होती.
मीडिया रिपोर्टनुसार, निवृत्त क्लर्क कलकप्पा निदागुंडी आणि केआरआईडीएलचा निवृत्त इंजिनीअरने अनेक रखडलेल्या प्रकल्पांचे बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणात कर्नाटकातील लोकायुक्तांनी क्लर्कच्या घरी छापा मारला. त्यानंतर कोट्यवधींचं घबाड हाती लागलं. याआधी चित्रदुर्ग, हासन, चिक्कबलापुरा आणि बेंगुळरुमध्ये ५ सरकारी अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणी छापे टाकले.
नाशिक सक्तवसुली संचालनालयाने माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकमधील आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर पाथर्डीत त्यांचा मालकीचा ४१३ चौरस मीटरच्या प्लॉट असल्याचे उघड झाले. अनिल पवार यांनी कायद्याच्या पळवाटा शोधून ईडीने सदर प्लॉट आपल्या नावे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.