Nagpur : 8 नवऱ्यांची बायकोचा हादरवणारा प्रताप; प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिका महिनाभरात दाखवयाची इंगा

nagpur Shocking news : नागपुरातील शिक्षिकेने धक्कादायक प्रताप केला आहे. पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या आहेत.
nagpur news
nagpur Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूरच्या शिक्षिकेचा हादरवणारा प्रताप समोर आला आहे. आठ नवऱ्याची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. गिट्टीखदान पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करत. त्यानंतर लग्नाच्या एक महिन्यानंतर भांडण करून त्याकडून पैसे उकळायला सुरुवात करत असल्याचा तक्रारीच्या आधारावर गिट्टीखदान पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. समीरा फातिमा असं या महिलेचे नाव आहे.

समीरा उच्चशिक्षित असून ती शिक्षक म्हणूनही काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. त्यानंतर लग्न करायची अशा पद्धतीची तिची मोडस होती. गुलाम पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

nagpur news
Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापासून फरार असलेल्या 'लुटेरी दुल्हन' ऊर्फ समीरा फातिमाला गिट्टीखदान पोलिसांनी आता अटक केली आहे. तिची पोलीस कोठडीतील चौकशी आज संपणार आहे. आरोपी समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर त्यांच्याशी लग्न करून खोटा निकाहनामा दाखवून फसवणूक करत होती. ती विवाहित पुरूषांना महिनाभरातच खोट्या आरोपात फसवण्याच्या धमक्या देत होती.

nagpur news
Ajit Pawar : चंद्रकांत पाटलांना अजून पुणेकर कोल्हापूरचे समजतात; अजित पवार असे का म्हणाले?

कोर्ट केस करत सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती. या फरार महिलेला दरम्यान सिव्हिल लाइन्स येथील टपरी येथे चहा प्यायला आली होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला अटक केली. पती गुलाम पठाण याने मार्च 2023- 24 मध्ये महिलेच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसात तक्रार दिली होती. या महिलेने २०१० पासून अनेक विवाहित पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. लग्नानंतर ती ब्लॅकमेल करायची. नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची. तिने आतापर्यंत 8 लग्न केल्याचा आरोप गुलाम पठाण यांनी केला.

nagpur news
Shocking : राज्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर गोळीबार, परिसर हादरला

शिक्षिका समिरा नवीन लोकांशी बोलायची. तेव्हा त्यांना माझा घटस्फोट झालेला आहे, अशी खोटी माहिती द्यायची. त्यानंतर पुरुषांना जाळ्यात ओढायची. मला तुमची साथ हवी आहे. मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील, असं म्हणत ती मुस्लिम पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर लग्न करायला लावायचे आणि पैसे वसूल करायचे तिने आतापर्यंत 50 लाखा रुपयाची फसवणूक केली. पण 10 लाख दिल्याचे पुरावे असल्याचं गुलाम पठाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com