Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Buldhana Crime News : बुलढाण्यात भरदिवसा प्रेम प्रकारणातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. बुलढाण्यातील घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Buldhana news
Buldhana Crime NewsSaam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

प्रेम प्रकारणातून सहा जणांनी मिळून एकाची भरदिवसा हत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली. बुलढाणयातील या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील चिखली रोडवरील हॉटेल ग्रीनलिफच्या बाजूला एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सनी सुरेश जाधव याला देवराज माळी याने बोलावलं. त्या ठिकाणी आणखी पाच जण उपस्थित होते. सनी बोलावलेल्या ठिकाणी म्हणजे ग्रीनलिफ हॉटेलजवळ आला. त्याच्याशी थोडी बातचीत केली. त्यानंतर देवराज माळी याने खिशातून चाकू काढून सनीच्या पोटात आणि छातीत खूपसला.

सनी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तेव्हा देवराज आणि त्याचे सर्व साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. जखमी सनी जाधवला सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरने सनीला मृत घोषित केले.

Buldhana news
Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

देवराज माळी याचे एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरु होतं. काही दिवसाआधी त्यांच्यात ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर त्या मुलीने सनी जाधव याच्याशी जवळीक साधली असल्याची माहिती देवराज माळीला कळलं. त्यावरून देवराज माळी याने सनीला मारहाण करणार असल्याची धमकी दिली होती.

Buldhana news
Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; शिंदे गटाच्या नेत्याला 50 लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

बुलढाणा शहरातील भिलवाडा परिसरातील देवराज माळी आणि त्याचे साथीदारांनी सनी जाधवची हत्या केली. सनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर तपासाचे चक्रे फिरवत काही तासांतच मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली.

Buldhana news
Uddhav Thackeray : योग्य व्यक्तीला योग्य खातं मिळालं; उद्धव ठाकरे यांचा माणिकराव कोकाटेंना टोला

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com