
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ फेरबदलावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. 'बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला आवडीचं खातं मिळालं. योग्य व्यक्तीला योग्य खातं मिळालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधला. ते मुंबईत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची ससून डॉक येथील कोळी बांधवांच्या प्रश्नांवर मुंबईत पत्रकार पार पडली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'सरकारची नेहमी चाल असते. एका पिल्लू सोडून बघतात. अंगावर आलं तर झटकून टाकायचं. जर ठरवलं. आंदोलनात उतरल्यावर वाटतं, जिंकलो. त्या गाफिलपणात राहिलो तर पोखरतात'.
'आता कोणाला मंत्रीमहोदय म्हणण्याची वेळ येईल, सांगता येत नाही. राजकारण्यांना सरकार टिकवायचं असतं. त्यामुळे कोणाला अचानक मंत्रिपद दिलं तर खूश होतात. त्याच्यामुळे सरकार टिकतं. त्याला त्या खात्याचं काय कळतं, काही नाही कळत हे बघितले जात नाही. बऱ्याच वर्षांनंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालं आहे. आता रमी खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली.
'कोळी बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करतात. मी मुख्यमंत्री असताना समुद्रात अनेक वादळे आली होती. काही वेळेला घाम फुटायचा. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून समुद्रात गेलेल्या मच्छिमारांविषयी माहिती विचारायचो. तुम्ही कुठे जाता, समुद्रावर दूरवर जाता. इथे आल्यानंतर तुम्हाला अपमानास्पद वागवले जात असेल. तुम्हाला हूसकावण्याची भाषा केली जात असेल. तो अन्याय तोडून मोडून राहिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.