Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

sushil kedia News update : सुशील केडियांच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Suresh kedia News
Suresh kedia Saam tv
Published On

महाराष्ट्रात राहूनही मराठी शिकणार नाही म्हणणाऱ्या उद्योजक सुशील केडिया याच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिलीच मोठी कारवाई केली आहे. तोडफोड करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वरळी पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Suresh kedia News
Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रात ३० वर्षांपासून राहतोय. पण मी मराठी बोलणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाना मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज, शनिवारी सकाळी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनेनंतर वरळी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Suresh kedia News
DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

वरळी पोलिसांनी मनसेच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 223,189 (2) 189(3), 190, 191(2), 191(3), 125, 324(4) 324(5), 37(1) c आणि 135 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. तसेच पाच कार्यकर्त्यांना वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत

Suresh kedia News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

केडियाने मागितली माफी

उद्योजक सुशील केडिया याने मराठी शिकणार नाही असं म्हणत ट्विटद्वारे राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज, शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडिया याच्या वरळीतील ऑफिसवर हल्लाबोल केला. ऑफिसच्या काचांवर नारळ फेकत तोडफोड केली. मनसेच्या खळखट्याकनंतर संजय केडिया याने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत नरमाईची भूमिका घेतली होती. तसेच राज ठाकरेंचा आदर असून मी माझे शब्द मागे घेतो असंही सांगितलं. तसंच माफीही मागितली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले मनसे पदाधिकारी कोण?

वरळी पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. गणेश साबळे, विकास तिवारी, आकाश कदम, योगेश पोकळे, आणि शरण मंडीवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे सर्व कार्यकर्ते माथाडी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com