Accident : पुणे-सातारा महामार्गावर भयंकर अपघात, २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा

Pune Satara Highway Accident Death : पुणे-सातारा महामार्गावरील भीषण अपघातात १७ वर्षीय दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन चालक घटनास्थळावरून पसार झाला. राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Satara highway accident kills two students : पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात १७ वर्षांच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नसरापूरहून येत असताना एका वाहनाने विद्यार्थ्यांच्या दुचाकाली मागून जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तुषार शिंदे आणि अर्थव पाटील या दोन मित्रांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

भोर तालुक्यातील सारोळा येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघात घडवून घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Pune Accident News
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी उलथापालथ? टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या आजचे ताजे भाव

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास सारोळा गावच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील हॉटेल नवलाई समोर हा अपघात झाला. तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव, ता. खंडाळा) आणि त्याचा मित्र अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हे दुचाकीवरून नसरापूरहून शिरवळच्या दिशेने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तुषार शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pune Accident News
Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तुषार शिंदे यांचे मामा राजेंद्र गोविंद नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे.

Pune Accident News
पुणे पोलिसांची कमाल! चोरी करून गायब झालेल्या चोरांना नेमके 'कुठे' गाठले? उत्तर ऐकून हसू आवरणार नाही

दरम्यान, कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परतत असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे नायगाव, शिरवळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू सर्वत्र हळहळ व्यक्त करणारा ठरला असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत

Pune Accident News
Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com