

Petrol diesel price today in Maharashtra cities : आखाती देशातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांमुळे देशातील इंधन दरांकडे सर्वसामान्यांचे बारीक लक्ष असते. अशातच जर तुम्ही आज पेट्रोल भरण्याचा विचार करत असाल. तर पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील ताजे दर तपासून घ्या. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत की त्यात काही बदल झाला आहे? जाणून घ्या सविस्तर.
मागील ३ आठवड्यात देशात अनेकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. पण आज मंगळवार, २ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळाला आहे. पण आज सकाळी कच्च्या तेलाच्या दरात ०.९१% घट झाली. ब्रेंट ऑइल फ्युचर्स सध्या प्रति बॅरल ९४.६१ डॉलरवर पोहोचले आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील ताजे दर काय आहेत?
मुंबई (Mumbai) : मुंबईत आज एक लीटर पेट्रोलसाठी ₹१११.१८ मोजावे लागत असून, डिझेलचा दर ₹९७.८३ प्रति लीटरवर स्थिर आहे.
पुणे (Pune): पुण्यात पेट्रोलचा भाव ₹११२.०४ प्रति लीटर आहे, तर डिझेल ₹९८.६८ प्रति लीटरने मिळत आहे.
नागपूर (Nagpur): नागपुरात पेट्रोल ₹१११.७५ आणि डिझेल ₹९८.४० प्रति लीटरच्या आसपास आहे.
नाशिक (Nashik): नाशिकमध्ये पेट्रोल ₹१११.९० आणि डिझेल ₹९८.५५ प्रति लीटर दराने विकले जात आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर (रु./लिटर)
दिल्ली – १०२.१२
मुंबई – १११.१८
कोलकाता – ११३.४७
चेन्नई – १०७.७७
बंगळूरू – ११०.९३
पाटणा - ११३.३५
भोपाळ – ११४.५४
देशातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर (रु./लिटर)
दिल्ली – ९५.२०
मुंबई - ९७.८३
कोलकाता – ९९.८२
चेन्नई – ९९.५५
बंगळूरू – ९८.८०
पाटणा - ९९.३६
भोपाळ – ९९.६४
पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यात शुल्कात कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात शुल्कात कपात केली. १ जूनपासून तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर ₹१.५० आणि डिझेलवर प्रति लिटर ₹१३.५० निर्यात शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क पेट्रोलवर प्रति लिटर ₹३ आणि डिझेलवर प्रति लिटर ₹१६.५० होते. आता तेल कंपन्यांना परदेशात विकल्या जाणाऱ्या देशांतर्गत उत्पादित तेलावर कमी कर भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.