Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?

Pune Ganesh Festival: पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?
Vidhyanand BapatSaam Tv
Published On
  • हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

    विद्यानंद बापट डीजेबाबतच्या आपल्या मतावर ठाम

  • विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला होता

  • पुण्यातील डीजे आणि ध्वनी प्रदूषणावर विद्यानंद बापट यांनी केले होते वक्तव्य

गणेशोत्सवात लावण्यात येणाऱ्या डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीला पुण्यातील तरुण विद्यानंद बापट यांनी विरोध केला. याच विद्यानंद बापट यांच्यावर माध्यमांशी संवाद साधत असताना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर आज त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली. 'अशा पद्धतीने मारहाण केल्याने निश्चय ढळत नाही.', असे मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही मतभेदात विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे, असे सांगत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

विद्यानंद बापट यांनी सांगितले की, 'मारहाण करणाऱ्यांना मी गांभीर्याने घेत नाही. चिप पब्लिसिटीसाठी हे सगळं करत आहेत. माकड चाळे करत आहेत. मला प्रसिध्दी नकोच आहे. तुम्ही मुद्दे पुढे न्या. मोर्चे काढले तर काही फरक नाही पडणार. बापट आणि पुणेकर हा मुद्दा नाही. उत्सव सार्वजनिक करायचे असतील तर ध्वनी प्रदूषण आणि रहदारीस अडथळा येत असतील तर करू नये. मी जो मुद्दा मांडत आहे त्याचा प्रतिकार करता येत नाही. माझे मुद्दे मी नागरिकांवर लादत आहेत. मी नॉर्मल आहे.'

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?
Pune : पुण्यात खळबळ! मध्यरात्री प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी उचललं; अटकेचा LIVE व्हिडिओ समोर

विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात धुडघूस घालणाऱ्यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, 'सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता मग ही तुमची संस्कृती आहे का? संघटना असेल किंवा काय करायचं आहे ते लवकर सांगू. पण मी विचार करतोय की संघटना वगैरे काढायला हवी. तो लढा तसाच चालू राहिल. संघटनात्मक रुप त्याला द्यायचे हे पाईपलाईनमध्ये आहे. मी याबद्दल जाहीर सांगणार नाही.

पुण्यात होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याबाबत सांगताना ते म्हणाले की, 'रविवारी होणाऱ्या मोर्चामध्ये मी सहभागी होणार आहे. जर मी जिवंत असेल आणि जाण्याजोग्या परिस्थितीत असेल तर मी नक्की जाईल. मला भीती वाटत नाही. पण डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा त्यांच्यासोबत काय झालं. त्यामुळे केव्हा काय होईल हे नक्की सांगता येत नाही. मी जाण्याजोगा असेल तर मी त्या मोर्चात सहभागी होणार आहे. '

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?
Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे आदेश, 24 तास पोलीस संरक्षण

डाव्या विचारांचे आहात म्हणून तुम्हाला टार्गेट केले जात आहे का? की तुम्ही हिंदूंच्या सणांना विरोध करत आहात. यावर बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, त्यांच्यातले योगी आदित्यनाथ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तरी ते त्यालाही विरोध करतील. मागच्या वेळी बालन आणि रासने महोत्सव त्यांनी केले होते. त्यांना वाटेल ते करून धुडघूस घालायचे. त्यांना सण उत्सवाची काही घेणं-देणं नाही. जे लोकं धार्मिक आणि उत्सव प्रेमी आहेत ते जरी असं म्हणाले तर ते विरोध करणार.'

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?
Pune News: डीजेविरोधात बोलणाऱ्या बापटांवर हल्ला, पुण्याला लाज आणणारी मंडळ अध्यक्षाची गुंडगिरी; पाहा VIDEO

तसंच, 'अशी लोक समाजकंटक आहेत. अशा लोकांना केवळ सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालायची असते. त्यांना फक्त सार्वजनिक ठिकाणी धुडघूस घालायची आहे. ते समाजकंठक आहेत. त्यापासून त्यांना जे कुणी रोखतील ते कुणी असले तरी ते त्यांना विरोध करणार. १३२ वर्षापासून ही परंपरा सुरू झाली तर काळानुसार त्यात बदल देखील केले पाहिजे. जर त्यांचा मिरवणुका काढण्याचा आग्रह असेल तर त्यांनी शहराबाहेरी ७-८ लेनमधील एका लेनमधून काढावी.', असे स्पष्टमत विद्यानंद बापट यांनी व्यक्त केले.

'उत्सव आनंदाचा असला पाहिजे; मात्र मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'डीजे, ढोल-ताशे किंवा इतर ध्वनिवर्धकांचे कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी आयोजित करण्याचा पर्यायही त्यांनी सुचविला. मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना चर्चेतून उत्तर मिळाले पाहिजे. नागरिकांची जागृती आणि नागरी चळवळ मजबूत झाली, तर ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल.', असे बापट यांनी सांगितले.

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?
Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? खड्ड्यांवर बोलाल तर जेलमध्ये जाल, यूट्युबर संतोष पंडित यांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com