

डीजेविरोधात बोलल्याने विद्यानंद बापटांवर पुण्यात हल्ला
पुण्यात विद्यानंद बापटांना भररस्त्यात मारहाण
विद्यानंद बापट यांच्यावर संतोष चव्हाणने केला हल्ला
गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाविरोधात विद्यानंद बापट आक्रमक
पुण्यातील विद्यानंद बापटांना झालेल्या मारहाणीची. डीजेविरोधात बोलणाऱ्या विद्यानंद बापटांना भररस्त्यात एका तरुणानं मारहाण केलीय..मात्र मारहाण करणारा हा तरुण नेमका कोण आहे? बापटांना मारहाण का करण्यात आली? डीजेला विरोध म्हणजे धर्माला विरोध असा वाद कसा निर्माण झालाय.पाहूयात या रिपोर्टमधून...
हा व्हिडिओ नीट पाहा... गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात आणि डीजेविरोधात आक्रमक आणि मुद्देसूद भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला करण्यात आलाय... टिळक रस्त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना एका तरुणांनं अचानक बापटांवर हल्ला केला... त्यांना बेदम मारहाणही त्या तरुणानं केली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काही पुणेकरांनी हल्लेखोरांला जाब विचारला तेव्हा काय झालं...ऐका...
दरम्यान बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण पुण्याच्या कोथरुडमधील राऊतवाडीचा रहिवासी असून प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचं समोर आलयं... तसचं बापटांवर हल्ला करण्याआधी हल्लेखोर संतोष चव्हाणनं इन्सट्राग्रामवर बापटांना धमकीवजा इशारा दिल्याचंही समोर आलयं...
दुसरीकडे हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी बापटांच्या विधानांचाही तपास करू, असं विधान पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलयं. दरम्यान बापटांवर हल्ला झाल्यानंतर DJला विरोध म्हणजे धर्माला विरोध अशीच भूमिका समोर येऊ लागलीय...त्यामुळे विद्यानंद बापटांवर चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप करत बापटांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू सेवा संघानं केलीय.
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटाविरोधात विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या बैठकीतही डीजे बंदीची मागणी केली होती. ज्य़ानंतर पुण्यात डीजेच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट निर्माण झाले आंहेत.
हिंदूत्ववादी संघटनांनी आता कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबल्यानं बापटांच्याही अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत...मात्र भररस्त्यात मुद्द्यांची लढाई लढणाऱ्या बापटांवर असा हल्ला करणं पुण्याला लाज आणणारं आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणवणाऱ्या पुण्याची हीच संस्कृती आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.