Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्य

Blood Donation : रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत आणि वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत सेवाभावी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. लोकार्पणापूर्वीच ५ लाखांहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्य
Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्यmeta ai
Published On
  • 'ब्लड इन नीड' आणि 'ऋणानुबंध' या सेवाभावी प्रकल्पाचे लोकार्पण..

रक्तदानातून माणसाचा श्वास आणि वृक्षसंवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो. सेवा हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. मिळालेले ज्ञान, सामर्थ्य, संपत्ती आणि कर्तृत्वाचा उपयोग समाजकल्याणासाठी केला पाहिजे. रक्तदान आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही सेवा मानवाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणत प्रत्येकाने आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले आहे.

सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त रविवारी,खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित ‘ब्लड इन नीड’ तसेच 'ऋणानुबंध' या देशव्यापी सेवाभावी प्रकल्पाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रकल्पाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि 'सकाळ' मल्टिमीडिया चे संपादक अंकित काणे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रमुख डॉ. सुहास मोहनळकर अध्यक्षस्थानी होते.'ब्लड इन नीड' च्या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना आणि रक्तदात्यांना तातडीने जोडण्यासाठी एका अॅप तयार करण्यात आले आहे. या

Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्य
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी; नियम मोडाल तर खबरदार

उपक्रमाच्या लोकार्पणाधीच ५ लाखाहून अधिक रक्तदात्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच 'ऋणानुबंध' प्रकल्पाच्या माध्यमातून ऍम्ब्युलन्स सेवा, देहदान सेवा, विनामूल्य शिक्षा सेवा, वृक्षारोपण सेवा अशा विविध सेवांचा लोकार्पण सोहळा पार पडला.या सेवा येणाऱ्या काळात अविरतपणे सुरु राहणार आहे. या सेवांचा देशभरातील नागरिकांना उपयोग होईल असा विश्वास याप्रसंगी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, "झाड आधी आले आणि मग माणूस आला. माणूस कितीही मोठा झाला, हिरो झाला तरी तो ऑक्सिजन तयार करू शकत नाही. तो त्याला झाडापासूनच मिळतो. त्यामुळं झाड हेच माझ्यासाठी हिरो आहे. सकाळी उठल्यावर श्वास भरून ऑक्सिजन घेता येणे ही खरी श्रीमंती आहे. ही श्रीमंती टिकवण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत.

अंकित काणे म्हणाले, "हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. ज्याला जी गरज आहे, त्याला ती पुरवणं हा सेवाभाव आपला धर्म शिकवतो. या सेवा धर्माची जपणूक नरेंद्राचार्यजी करत आहेत. धर्माचं तत्वज्ञान कृतीत आणणाऱ्या त्यांच्या सारख्या माणसांच्या आपण मागे उभं राहिलं पाहिजे.

Pune News : रक्तदानाने माणसांचा, वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो - रामानंदाचार्य नरेंद्रचार्य
दुःखाच्या सावलीतून नव्या आयुष्याकडे; कोरोनाकाळात पती गमावलेल्या एकल मातेचे CM फडणवीसांनी केले कन्यादान

"रक्ताची गरज असलेल्या माणसाला रक्तदात्यापर्यंत पोहोचवून देण्याचं मोलाचं काम करणारे हे कदाचित पहिले अॅप असेल. शासनाच्या माध्यमातून ही संकल्पना कशी व्यापक करता येईल. या बाजूनेही प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ. मोहनाळकर यांनी दिली. ब्लड इन नीड या ऍपच्या उभारणीत योगदान दिलेल्या तरुण उच्चशिक्षित सेवक-सेविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com