Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे आदेश, 24 तास पोलीस संरक्षण

Vidyanand Bapat attack : पुण्यातील गणेशोत्सवात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार, बापट यांना पोलीस संरक्षण दिले जाणार आहे.
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, थेट आदेश काढला
Vidyanand Bapat attacksaam tv
Published On

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर आज, गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, बापट यांना पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सवात डीजे नको अशी ठाम भूमिका विद्यानंद बापट (Vidyanand Bapat attack) यांनी घेतली होती. यासंदर्भात त्यांनी आवाज उठवल्यानंतर पुणेकरांकडूनही त्यांना पाठिंबा मिळाला होता. डीजे बंदीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर बापट यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दुसरीकडे, बापट यांच्या भूमिकेला विरोधही होत आहे. बापट हे गुरुवारी सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत असतानाच, एका व्यक्तीनं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यातील संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींकडून प्रतिक्रियाही देण्यात आल्या. पुण्यातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी; तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून या हल्ल्याच्या घटनेचा निषेधही व्यक्त करण्यात आला होता. हल्ल्याच्या घटनेच्या काही तासांतच त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, थेट आदेश काढला
विद्यानंद बापटांवर हल्ला करणाऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात, पोलीस आयुक्त काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. यापुढे बापट यांच्यासोबत पोलीस संरक्षण असेल. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ही माहिती दिली. बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, थेट आदेश काढला
Vidyanand Bapat Video: पुण्यात टिळक रोडवर मोठा गोंधळ! विद्यानंद बापटांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com