विद्यानंद बापटांवर हल्ला करणाऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात, पोलीस आयुक्त काय म्हणाले?

Vidhyanand Bapat Attack Case: डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात मुलाखतीदरम्यान हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत हल्लेखोराला ताब्यात घेतलंय.
Vidhyanand Bapat Attack Case:
Vidhyanand Bapat assaulted during television interview in Punesaamtv
Published On
Summary
  • डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला

  • बापट हे वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला

  • पुणे पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

विद्यानंद बापट यांना हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याने बापट यांना मारहाण का केली याचा तापस पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

दरम्यान विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या डीजेविरोधी भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झालेत. आज सकाळी एक वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांना एका तरुणाने मारहाण केली. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त केला जातोय.

कोण आहे हल्लेखोर?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बापट हे कशाळे चौक परिसरात माध्यम प्रतिनिधींना मुलाखत देत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. बापट यांना मारहाण करणाऱ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याचे नाव संतोष चव्हाण आहे. तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचे सांगितलं जातंय. राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचीही माहिती समोर आलीय.

Vidhyanand Bapat Attack Case:
Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काय विधान केले?

बापट यांच्यावर हल्ला केलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. नेमकं त्याने हे कृत्य का केलं याचा तपास सुरूय. अशा कुठल्या प्रकारच्या घटना कोणी केल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण असं कोणी केलं तर त्याच्यावर नक्की कारवाई होणार. गणेश मंडळांच्या प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक झालीय. त्यांच्याकडून सुद्धा आता ४ बेस आणि ४ टॉप साठी तयारी दाखवण्यात आलीय.शासनाने जो निर्देश दिलाय, त्याचे पालन सगळ्या आयोजकांनी केलं पाहिजे.

Vidhyanand Bapat Attack Case:
गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! 'या' चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत DJ-स्पीकर वाजवण्याची परवानगी

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेचा आवाज, ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक शांततेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. या पार्श्वभूमीवर बापट यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com