Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Vidhyanand Bapat In Trouble: गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करताना चर्चेत आलेले विद्यानंद बापट आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय कुलकर्णी यांनी काही भूमिकांवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.
Vidhyanand Bapat  In Trouble
Vidhyanand Bapat Ganeshotsav Row; Dhananjay Kulkarni Seeks Action Over Other Standssaam tv
Published On
Summary
  • विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील काही भूमिकांवरून पुण्यात नवा वाद

  • माजी प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी बापट यांच्या काही भूमिकांवर आक्षेप घेतला

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी कुलकर्णींची भूमिका

गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाला विरोध करणारे विद्यानंद बापट अडचणीत येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवातील मंडप, मिरवणुकीचे मार्ग आणि उत्सवाच्या आयोजनाबाबत बापट यांनी घेतलेल्या भूमिकेला काही जणांकडून विरोध होतोय. याच दरम्यान एसएनडीटी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आणि विद्यार्थी चळवळीत काम केलेले धनंजय कुलकर्णी यांनी बापट यांच्या काही भूमिकांवर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेला आमचा विरोध नाहीये. उलट कर्कश आवाजातील डीजेला आमचा विरोध आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी,” अशी आमची भूमिका आहे. परंतु बापट यांनी गणेशोत्सवाशी संबंधित इतर काही मुद्दे उपस्थित केलेत, त्याला आमचा आक्षेप असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.

Vidhyanand Bapat  In Trouble
पुण्यातील डीजेचा आवाज बंद करणारे विद्यानंद बापट कोण? ध्वनी प्रदूषणाविरोधात जनआंदोलन पेटलं!

विद्यानंद बापट हा दिमागी नक्षल आहे. त्याने भारतीय परंपरा म्हणजे केशवपन, सतीप्रथा असे वर्णन करून गणेशोत्सव अशा भारतीय परंपरे नुसार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुळात या सर्व कुप्रथा काही शतकानं पूर्वीच बंद झाल्या आहेत. तरी आजच्या गणेशोत्सवाला विरोध करण्यासाठी या कुप्रथांचा आधार बापट घेत आहेत.

तसेच रस्त्यावर गणेश मंडप उभारणीस याचा विरोध आहे. याचा गणेश विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने नेण्यास विरोध आहे. मुळात याचा गणेश उत्सवालाच विरोध आहे. हा हिंदू विरोधी मानसिकतेचा एक शहरी नक्षली आहे. याचा रस्त्यावर नमाज पडण्यास विरोध नाही. याचा ईदच्या मिरवणुकीस विरोध नाही. याला या प्रश्नाचे निमित्त करून समाजात अराजकता माजवायची आहे. हा एक अराजकवादी मानसिकतेचा हिंसा समर्थक नक्षली आहे.

स्वतः चे नाव बापट याचे त्याला भांडवल करायचे आहे. तो स्वतःस सेनापती बापट यांचा अवतार समजतो. त्याला असे वाटते माझ्या तर्काला उत्तर देण्यास कोणीही अस्तित्वात नाही. असा हा व्यक्ती समाज विघातक शक्ती म्हणून समोर आला आहे. त्याला असे वाटते की त्याचा वर कोणी तरी दाभोळकर प्रमाणे हल्ला करतील. यातून त्याची मानसिकता लक्षात येते.

Vidhyanand Bapat  In Trouble
गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

खरे तर डीजे मुक्त गणेशोत्सवाला कोणाचाही विरोध नाही . परंतु या डीजे मुक्तीच्या निमित्ताने येथील गणेश उत्सवाला विरोध करण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. गणेश उत्सव या धार्मिक सामाजिक उत्सवासाठी हिंदू जनता आनंदाने थोडा त्रास १० दिवसासाठी सहन करते त्यासाठी कोणतीही तक्रार नाही. परंतु या नक्षलांना येथे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहावे असे वाटतच नाही . यांना येथील कायदा-व्यवस्था मंजूर नाहीये. यांना रस्त्यावरून देशाचा कारभार चालला पाहिजे ही यांची मानसिकता आहे.

माझी अशी मागणी आहे, या विद्यानंद बापटला समाजात अराजकता निर्माण करण्यासाठी , धार्मिक भावना दुखावणे , दंगली घडवण्यासाठी जनतेस प्रेरित करणे या गुन्ह्या खाली या बापट वर गुन्हा दाखल करा . त्यावर येथील कायद्या नुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी

धनंजय कुलकर्णी यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com