पुण्यातील डीजे आवाज बंद करणारे विद्यानंद बापट कोण? ज्यांच्या आवाजानं जनआंदोलन पेटलं!

Who Is Vidhyanand Bapat : कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. पुणे महानगरपालिकेतील त्यांच्या भूमिकेपासून सोशल मीडियेत चर्चेत आहेत.
Vidhyanand Bapat statement on DJ and loudspeaker noise during Ganeshotsav
Vidhyanand Bapat statement on DJ and loudspeaker noise during Ganeshotsav
Published On
Summary
  • कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे.

  • पुणे महानगरपालिकेत त्यांनी डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी

  • या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले.

गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट यांनी आवाज उठवलाय. यानंतर विद्यानंद बापट नावाचा शोध इंटरनेटवर घेतला जातोय. पुण्यातील महानगरपालिकेत बापट यांनी डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालावी अशी मागणी केलीय. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढलं, यामुळे बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आलेत.

Vidhyanand Bapat statement on DJ and loudspeaker noise during Ganeshotsav
Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

विविध माध्यम आणि पॉडकास्टना दिलेल्या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी ध्वनिप्रदुषणाबाबतचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडलाय. संयमी आणि प्रभावी मराठी भाषेत त्यांनी त्यांचा मुद्दा समाजासमोर ठेवला. त्यांची भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतील शब्द लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कधीच न दिसलेले, कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रेसर नसलेले. पण आता आता अचानक चर्चेत आलेले हे विद्यानंद बापट नक्की कोण?

Vidhyanand Bapat statement on DJ and loudspeaker noise during Ganeshotsav
Ganeshotsav : यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ नाही तर थेट १२ दिवसांचा! 'हे' कारण समोर; पंचांगकर्त्यांचा मोठा खुलासा

विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा वारसा नाहीये. ते एका सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यानंद बापट हे ३७ वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. बहुतेकवेळा ते घरातूनच काम करतात. ते मुळचे रत्नागिरीचे आहेत. विद्यानंद बापट गेल्या ८ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. त्यांचे आई-वडिल अजूनही रत्नागिरीतच असून तिथंच विद्यानंद यांचं बालपण गेलं.

तिथेच त्यांनी शिक्षण घेतलंय. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलीय. पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात. तसंच ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं एक वृत्तपत्रानं आपल्या वृत्तात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com