Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Auto-Taxi Fares Increase In Mumbai Pune: मुंबईसह पुण्यामध्ये रिक्षाचा प्रवास महागला आहे. तर मुंबईमध्ये ट्रक्सीच्या प्रवासासाठी देखील प्रवाशांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार घ्या जाणून...
Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?
Auto Taxi Fares IncreaseSaam Tv
Published On
  • मुंबई-पुण्यातील प्रवास महागला

  • आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचे नवीन दर लागू

  • रिक्षाचं किमान भाडं १ रुपयानं तर टॅक्सीचे भाडं २ रुपयांनी वाढलं

  • पुण्यात देखील रिक्षाच्या प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार

मुंबईतील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आजपासून प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला. मुंबईसह उपनगरामध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने म्हणजे एमएमआरटीएने दोन्ही वाहनांच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. सुधारित भाडेदर १ सप्टेंबर म्हणजे आजपासून लागू झाली आहे. रिक्षाचं किमान भाडं १ रुपयानं तर टॅक्सीचे भाडं २ रुपयांनी वाढलं आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो-रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये झाले आहे. तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले आहे. प्रवाशांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३३ रुपये मोजवे लागणार आहे. सुधारीत भाडेवाढीनंतर ऑटो-रिक्षाचे भाडे प्रति किलोमीटर १७.१४ रुपयांवरून १८.२२ रुपये प्रति किलोमीटर झाले आहे. त्याचप्रमाणे, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे भाडेही प्रति किलोमीटर २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले आहे.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?
Auto - Taxi driver : ..तर अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई होणार, परिवहन विभागाचा अल्टिमेटम

ही भाडेवाढ मुंबई महानगर प्रदेशात लागू असणार आहे. ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक त्यांच्या इलेक्ट्रॉनिक भाडे मीटरमध्ये सुधारित दर समायोजित केल्यानंतरच नवीन भाडे आकारू शकतील. ज्या वाहनांचे मीटर सुधारित केलेले नाहीत त्यांचे चालक आरटीओने मंजूर केलेला भाडे तक्ता प्रवाशांना दाखवून नवीन दरांनुसार भाडे आकारू शकतील. आजपासून प्रवाशांना ऑटो-रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी वाढीव भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडेल.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?
Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन्स होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

दरम्यान, पुण्यामध्ये देखील रिक्षाचा प्रवास महागला आहे. आजपासून पुणेकरांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रूपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्य खिशावर ताण आला आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. पुण्याती नागरिकांना आजपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रूपये आणि नंतरच्या प्रति किलोमीटरसाठी २० रूपये दर द्यावा लागणार आहे. यासाठी रिक्षा चालकांना मीटरचे रिकॉलिब्रेशन करून घ्यावे लागणार आहे. हा निर्णय पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी लागू असणार आहे.

पुण्यातील रिक्षा भाडेवाढ अशी असेल -

दीड किलोमीटरसाठी जुना दर- २५ रुपये

दीड किलोमीटरसाठी नवीन दर- ३० रुपये

पुढील प्रतिकिलोमीटर जुना दर- १७ रुपये

पुढील प्रतिकिलोमीटर नवीन दर- २० रुपये

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलणार; घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन टाइम टेबल घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com