Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन्स होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Auto Taxi Transport New Rules Update News : महाराष्ट्रातील कॅब आणि ऑटो चालकांसाठी मराठी येणे अनिवार्य आहे. मराठीचे ज्ञान नसल्यास परवाना निलंबित किंवा कायमचा रद्द होण्याची शक्यता.
Auto Taxi Transport Marathi New Rules Update News
Auto Taxi Transport Marathi New Rules Update NewsAI Image
Published On
Summary
  • कॅब आणि ऑटो चालकांसाठी मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक

  • मराठी येत नसल्यास चालकाच लायसन्स होणार रद्द

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्वाची माहिती

कॅब किंवा ऑटो चालकांनो लक्ष द्या! प्रवाशांशी मराठीत बोलले नाही तर, लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचे व्यवहारिक ज्ञान नसलेल्या चालकांवर परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जाहीर होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करून ‘antecedents’ या शब्दांनंतर “and working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालवण्याच्या अधिकृततेसाठी अर्ज करताना मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

Auto Taxi Transport Marathi New Rules Update News
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

नव्या नियमानुसार, एखाद्या चालकाला मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास प्रथम त्याला एक महिन्याची मुदत देण्यात येईल. या काळात मराठी शिकण्यात सुधारणा न झाल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मंत्री सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठीची अट यापूर्वीही नियमांमध्ये होती; मात्र तिची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. प्रवाशांशी सहज आणि प्रभावी संवाद साधता यावा, विशेषतः स्थानिक प्रवाशांना सेवा देताना भाषेचा अडथळा येऊ नये, यासाठी ही अट महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. मंजुरी मिळाल्यानंतर आता या निर्णयाला कायदेशीर स्वरूप मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com