

केतन अग्रवालचा मृत्यू अपघाती नसून त्याची हत्या करण्यात आली
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली
केतनच्या वडिलांनी सियाच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले
हत्येसाठी लोहगड किल्ल्यावर आधीपासून कट रचला होता
पिंपरी चिंचवड शहरातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या २६ वर्षाच्या मुलगा केतनच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केतनचा मृत्यू किल्ल्यावरून पाय घसरून दरीत पडल्यामुळे झाला नााही तर त्याला किल्ल्यावरून खाली ढकलण्यात आल्याचे तपासातून समोर आले. मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर कट रचून त्याची हत्या करण्यात आली होती.
या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना बेड्या ठोकल्या. सिया गोयलचे चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने या दोघांनी केतनची हत्या केली. दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला होता. सियाच्या वाढदिवसानिमित्त केतन आणि ती लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. त्याठिकाणी चेतन चौधरी देखील गेला होता. त्यानेच केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले.
केतनच्या हत्येला फक्त सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेच दोषी नसून सिया गोयलचे कुटुंबीय हे देखील तितकेच दोषी आहेत, असा आरोप केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे. सिया गोयलचं लग्नापूर्वी चेतन चौधरीशी प्रेमसंबंध होते याची माहिती सियाच्या कुटुंबीयांना माहिती असताना सुद्धा त्यांनी आमच्यापासून ही माहिती लपवून ठेवली आणि त्यातूनच सियाने आपल्या प्रियकरा सोबत माझ्या मुलाची हत्या केली असा आरोप विशाल अग्रवाल यांनी केला.
सियाने यापूर्वी देखील माझ्या मुलाचा पासपोर्ट गहाळ केला होता. तसेच तिने या पूर्वी देखील लोहगड किल्ल्यावर माझ्या मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा सणसणीत आरोप विशाल अग्रवाल यांनी केला आहे. केतनच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.