Pune Crime: प्रसिद्ध अग्रवाल बिल्डरच्या मुलाची निर्घृण हत्या, होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट खोल दरीत ढकललं; पुण्यातील थरारक घटना

Lohagad Fort Accident: मावळमधील लोहगडावरून पडून पुण्यातील प्रिसद्धि बिल्डरच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.
Pune Crime: प्रसिद्ध अग्रवाल बिल्डरच्या मुलाची निर्घृण हत्या, होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट दरीत ढकललं; पुण्यातील थरारक घटना
Lohagad Fort Accident, Ketan AgrawalSaam
Published On
  • पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा मृत्यू

  • लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

  • पोलिस तपासात हत्येचा धक्कादायक खुलासा

  • होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला अटक

दिलीप कांबळे, मावळ

लोहगडावरून पाय घसरून पडून पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा तरुण आपल्या होणाऱ्या बायकोसोबत ट्रेगिंकसाठी गेला असता ही घटना घडली होती. पण या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. होणाऱ्या बायकोनेच्या प्रियकराने त्याला लोहगडावरून ढकलून दिल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगडावरून तरुण दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनं आता वेगळे वळण घेतलं आहे. फोटोसाठी पोज देताना केतन अग्रवाल या तरुणाचा पाय घसरून तो दरीत पडला होता अशी माहिती आधी समोर आली होती. पण आता तपासातून त्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. तो दरीत पाय घसरून पडला नाही तर त्याला ढकलून दिलं. केतनच्या होणाऱ्या बायकोसह तिच्या प्रियकराला याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

Pune Crime: प्रसिद्ध अग्रवाल बिल्डरच्या मुलाची निर्घृण हत्या, होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट दरीत ढकललं; पुण्यातील थरारक घटना
Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

गुरुवारी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन आणि त्याची होणारी बायको लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं तिने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झालं. होणाऱ्या बायकोच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचे तपासातून समोर आलं. या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरु आहे. केतनची हत्या करण्यासाठी तिच्या प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Pune Crime: प्रसिद्ध अग्रवाल बिल्डरच्या मुलाची निर्घृण हत्या, होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट दरीत ढकललं; पुण्यातील थरारक घटना
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

दरम्यान, २६ वर्षांच्या केतन लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत पडला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या केतनचा जागीच मृत्यू झाला होता. केतन विशाल अग्रवाल मावळच्या गहुंजे येथे राहत होता. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. केतन देखील याच व्यवसायात कार्यरत होता. त्याच्या पाश्चात आई-वडील, बहीण, दोन काका आणि दोन चुलत भाऊ असा परिवार आहे.

Pune Crime: प्रसिद्ध अग्रवाल बिल्डरच्या मुलाची निर्घृण हत्या, होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट दरीत ढकललं; पुण्यातील थरारक घटना
Pune Crime: इन्स्टावर रील आणि पिस्तुलांची डील; पुण्यातील कुप्रसिद्ध डीलर 'बबलू' लातूरमध्ये लॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com