Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

Pune Crime: पुण्यातील आर्वी येथे घरगुती वादातून 25 वर्षीय विवाहितेला संपवलं. पतीला अटक करण्यात आली असून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात घरगुती वादातून एका विवाहितेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेत पतीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय रुतुजा तावरेचं लग्न अक्षय रामदास तावरे याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही काळापासून पतीकडून तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.

Crime News
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

पोलिस तक्रारीत नमूद केल्यानुसार, 17 जून रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा घरगुती कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्याच दरम्यान अक्षय तावरेने पत्नी रुतुजा हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Crime News
Sangli Crime News: कॅफेत बोलावलं अन्...; सांगलीत अल्पवयीन तरुणीसोबत घडलं क्रूर कृत्य

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. रुतुजाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुतुजाचा अवघा दीड वर्षांचा मुलगा असून त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने खेडशिवापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी पती अक्षय रामदास तावरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून घटनेमागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com