Sangli Crime News: कॅफेत बोलावलं अन्...; सांगलीत अल्पवयीन तरुणीसोबत घडलं क्रूर कृत्य

Sangli Crime News: सांगलीतील विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून परिसरातील कॅफेंची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam Tv
Published On

Sangli Crime News: सांगलीतील विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून परिसरातील कॅफेंची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील काही कॅफेंमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला एका कॅफेमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी काही दिवसांपासून पुन्हा पिडितेसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न होता. यामुळे ती पिडिता खूप घाबरली आणि तिने सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला.

Sangli Crime News
Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत समर्थ देवकुळे या तरुणाला अटक केली आहे. प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान या संघटनेने विश्रामबाग परिसरातील काही कॅफेंची पाहणी केली. या वेळी काही ठिकाणांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवण्यात आले.

Sangli Crime News
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार; २५ वर्षीय तरुणाला चाकू भोसकला, हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद

संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परिसरातील अनेक कॅफेत पाहणी केली. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. काही कॅफे बंद आढळल्याचे तसेच काही चालकांनी दुकाने तात्पुरत्या बंद केल्याचे यावेळी त्यांच्या लक्षात आले.

विश्रामबाग परिसरात सुरू असलेल्या काही कॅफेंची नियमांनुसार तपासणी व्हावी, तसेच अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून पोलिसांकडून संबंधित पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com