Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

Crime News: गुरुग्राममध्ये, एका तरुणाने लग्नाला अवघे तीन महिनेच झाले असताना आपल्या गर्लफ्रेंडसोबत मिळून पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. शिवाय, मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार झाले.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Crime News: हरियाणातील गुरुग्राम येथील मानेसर भागातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच एका नवविवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर करण्यात आला आहे. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी पतीने हा गुन्हा लपवण्यासाठी धक्कादायक खोटी कहाणी रचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मधू २१ मेपासून बेपत्ता

मृत महिलेचे नाव मधू असे असून तीन महिन्यांपूर्वीच तीचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मधूचा शेवट इतक्या भयानक पद्धतीने होईल, याची कल्पनाही तिच्या कुटुंबीयांना नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार, २१ मे रोजी मधू अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कोणताही मागमूस लागत नव्हता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलीसात तक्रार दाखल केली.

Crime News
Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

पती म्हणाला 'ती पळून गेली'

दरम्यान, मधू बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पतीने एक धक्कादायक दावा केला. त्याने कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगितले की, मधू घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली आहे. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला; मात्र दिवसेंदिवस मधूचा काहीच पत्ता न लागल्याने संशय वाढू लागला. अखेर कुटुंबीयांनी थेट पतीवरच संशय व्यक्त करण्यात सुरुवात केली.

Crime News
Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

गर्लफ्रेंडच्या बाथरुममध्ये आढळला मृतदेह

तपासादरम्यान पोलिसांचा संशय आरोपीच्या प्रेयसीवर गेला. रविवारी पोलीस तिच्या खोलीपर्यंत पोहोचले असता, दरवाजाला बाहेरून कुलूप लावलेले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी खोलीतून दुर्गंधी येत होती. बाथरूमचा दरवाजा उघडताच पोलिसांना मधूचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून पोलिस आणि परिसरातील लोक त्यावेळी हादरून गेले.

मृतदेहाची अवस्था पाहता, खून काही दिवसांपूर्वीच करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चौकशी सुरू आहे. मानेसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com