Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

Crime News: लग्नाचे आमिष दाखवत विद्यार्थिनीवर अत्याचार करून आरोपीने अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Crime News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे मानवी नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून खूप काळापर्यंत ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ग्वाल्हेरमधील पडाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून ती एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख मोरेना जिल्ह्यातील कैलास येथे राहणाऱ्या अभिषेक जादोन याच्याशी झाली होती. सुरुवातीला मैत्री असलेले हे नाते नंतर प्रेमात बदलले. आरोपीने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिचा विश्वास जिंकला.

त्यानंतर आरोपीने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने वृंदावन येथे नेले. तेथे दोघे एका हॉटेलमध्ये पाच दिवस थांबले होते. या काळात आरोपीने तिच्या भांगात कुंकू भरत स्वतःला तिचा पती असल्याचे सांगितले आणि लवकरच पारंपरिक पद्धतीने लग्न करू, असे आश्वासन दिले.

Crime News
Ram Charan On Jasprit Bumrah: प्रसिद्ध अभिनेत्यानं जसप्रीत बुमराहची मागितली माफी; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

पीडितेच्या आरोपानुसार, आरोपीने तिच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. ती अर्धबेशुद्ध अवस्थेत असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, त्याने मोबाईलवर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. वृंदावनहून परतल्यानंतर आरोपीचे वर्तन पूर्णपणे बदलले. त्याने ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Crime News
Crime News: गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे नको ते व्हिडिओ; बायकोचे ते व्हिडिओ पाहून घेतला टोकाचा निर्णय

तक्रारीनुसार, आरोपीने ग्वाल्हेरमधील एका हॉटेलसह इतर अनेक ठिकाणीही पीडितेचे लैंगिक शोषण केले. जेव्हा पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर २० एप्रिल रोजी त्याने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी अभिषेक जादोन याच्याविरोधात बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com