Solapur : महामार्गावर रक्ताचा सडा, मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, २ मित्रांचा जागीच मृत्यू

Solapur Road Accident Today : सोलापूरच्या विजापूर रोडवरील हात्तुरे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करून परतत असताना ट्रकच्या धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला.
Solapur Road Accident Today
Solapur Road Accident Today
Published On

Solapur Accident News : सोलापुरातील विजापूर रोडवरील हात्तुरे ब्रिजजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. रहमान मौला ढवळगी आणि राजू इमामसाब शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

रहमान आणि राजू हे दोघे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मोटारसायकलवरून सलगर वस्तीकडे परतत होते. यादरम्यान हात्तुरे ब्रिजजवळ त्यांच्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या एका ट्रकशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सलगर वस्ती परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही तरुण मित्रांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Solapur Road Accident Today
Rain Update : मान्सून वेगात! कोणत्याही क्षणी केरळात धडकणार; महाराष्ट्रात कधी येणार? हवामान विभागाचा मोठा अंदाज

घाटात क्रेनचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात; चिमुरड्यासाह २ जण ठार

नाशिकच्या चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी एसटी बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच, संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात घडला आहे. राहुड घाट उतरत असताना एका क्रेनचे ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे क्रेनवरील नियंत्रण सुटले आणि या भरधाव क्रेनने समोरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत एका कारमधील लहान मुलासह दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात क्रेनने एका आयशर टेम्पो, कार आणि आपे रिक्षाला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, आपे रिक्षा क्रेनच्या पुढील भागात अडकून तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत रिक्षात अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चांदवड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

Solapur Road Accident Today
MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com