Rain Update : मान्सून वेगात! कोणत्याही क्षणी केरळात धडकणार; महाराष्ट्रात कधी येणार? हवामान विभागाचा मोठा अंदाज

Monsoon latest Upate : मान्सून वेगाने पुढे सरकत असून पुढील 24 तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला.
Monsoon 2026: पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
Monsoon 2026Saam Tv
Published On

when will monsoon reach Maharashtra in 2026, IMD forecast : कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मान्सून अत्यंत वेगात पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांमध्ये तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात नवीन अंदाज जाहीर केलाय. त्यात मान्सूनच्या प्रवासाचा वेग आल्याचे स्पष्ट केले आहे.

मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Monsoon 2026: पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील ५ दिवस 'हाय अलर्ट'

मुख्य मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.

Monsoon 2026: पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
Kolhapur : कोल्हापूर हादरले! ४ जणांचा तरूणीवर सामूहिक बलात्कार, अश्लील व्हिडिओ काढले अन्...

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक उकाड्याने बेजार झाले होते. मात्र, आता मान्सून अगदी उंबरठ्यावर आल्यामुळे आणि राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा असल्याने वातावरणात मोठा गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस मुंबई, पुण्यासह राज्यात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon 2026: पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com