

monsoon arrival in Kerala latest update, IMD forecast for Maharashtra : देशभरातील बळीराजासह संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे, तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल, अशी चिन्हं सध्याच्या हवामान प्रणालीच्या (Development) हालचालींवरून दिसत आहेत. पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तळकोकणात मान्सून धडकेल. अन् कोकणातून मुंबई आणि महाराष्ट्रभर मान्सून प्रवास करेल, असा अंदाज आहे. १० तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मुख्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील हवामानात वेगाने बदल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांत सध्या मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पुणे कोकणाला इशारा
मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत हवामान बदलले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावासने हजेरी लावली आहे. उष्णता कमी झाली असून मराठवाडा विदर्भ कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
एलनिनोचा मोठा फटका; पावसाचा अंदाज घटवला
प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या 'एलनिनो'च्या (El Niño) प्रभावामुळे यंदा मान्सूनवर मोठे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, देशातील एकूण पावसाचा अंदाज आधीच्या ९२ टक्क्यांवरून घटवून आता ९० टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच यंदा देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.