Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana Installment Latest Update : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारी ते मे महिन्यांचे रखडलेले चार हप्ते दोन टप्प्यांत जमा होण्याची शक्यता आहे. ₹६००० लाभाबाबतची संपूर्ण माहिती वाचा.
Women beneficiaries checking Ladki Bahin Scheme ₹6000 installment payment update
Ladki Bahin Installment Dateसाम टीव्ही मराठी
Published On

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment Date : राज्यातील काही पात्र लाडक्या बहि‍णींना मागील ४ महिन्यांपासून एकही हप्ता खात्यावर जमा झाला नाही. या लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ६ हजार रूपये जमा होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांचे हप्ते रखडले आहेत. पात्र महिलांच्या खात्यात २ टप्प्यात आता ६ हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

ईकेवायसीनंतर राज्यातील लाडक्या बहीण योजनेत ८० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण यामध्येच काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यावर मासिक लाभ जमा झाला नाही. त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ दिवसांत पहिल्या टप्प्याचे ३ हजार रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. तर पुढील काही दिवसांत उर्वरित २ महिन्यांचा हप्ता त्या महिलांना मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

Women beneficiaries checking Ladki Bahin Scheme ₹6000 installment payment update
Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे वर्ग झाले नाहीत, त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही, अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील ८० लाख महिला ईकेवायसीनंतर अपात्र ठरल्या आहेत. पण त्याचवेळी अनेक महिलांच्या खात्यात पात्र असताना आणि ईकेवायसी केली असतानाही पैसे जमा झाले नाहीत. ४ महिन्यांपासून हप्ता मिळाला नसल्याने लाडक्या बहि‍णींमध्ये नाराजी आहे. त्याशिवाय विरोधकांकडून गंभीर आरोपही केले जात आहेत. पण आता सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर २ टप्प्यात ६ हजार रूपये जमा होणार आहेत. आधी फेब्रुवारी-मार्च, त्यानंतर एप्रिल आणि मे.. असे पैसे जमा होतील, असे सांगण्यात आलेय.

Women beneficiaries checking Ladki Bahin Scheme ₹6000 installment payment update
Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

एप्रिल २०२६ रोजी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी करण्याची मुदत संपली. त्यानंतर सरकारकडून अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याचे समजतेय. लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, १४ हजार पुरूष, ५ लाख सरकारी कर्मचारी, आयकर भरणाऱ्या १० लाख महिला, ६५ वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या लाखो महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Women beneficiaries checking Ladki Bahin Scheme ₹6000 installment payment update
Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

दरम्यान, अपात्र लाडक्या बहिणींकडून कोणतीही वसूली केली जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण ज्या १४ हजार पुरूषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याशिवाय ज्या महिला पात्र आहेत, पण ईकेवायसी करता आली नाही अथवा चुकली आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ईकेवायसी प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Women beneficiaries checking Ladki Bahin Scheme ₹6000 installment payment update
Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com