Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

when will Ladki Bahin Yojana installment come : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? जून १० ते १५ दरम्यान पैसे खात्यात येण्याची शक्यता. ८० लाख महिला अपात्र ठरल्यानंतरची मोठी अपडेट वाचा.
Maharashtra Ladki Bahin Yojana
Maharashtra Ladki Bahin YojanaSaam TV Marathi
Published On

Ladki Bahin Yojana May payment date, ₹1500 installment update : राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याकडे लाडक्या बहि‍णींच्या नजरा खिळल्या आहेत. मे महिना संपल्यानंतरही अद्याप सरकारकडून १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. ३० एप्रिल रोजी ईकेवायसीची मुदत संपली आहे, त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. (Ladki Bahin Yojana Payment Status)

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin scheme latest news today

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची ३ हजार रूपयांची रक्कम एकाचवेळी खात्यात जमा झाली होती. १३ मे पासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३ हजार रूपये जमा झाले होते. आता मे महिना संपून जून महिना सुरू झाला, पण याबाबत सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येणार? Ladki Bahin Installment, ₹1500 Payment Update

मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहि‍णींना जून १० ते १५ या दरम्यान मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. कारण, प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल, असा जीआर सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याच्या हप्त्यावर निर्णय घेण्यात येईल.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 80 लाख लाडक्या बहि‍णींचे १५०० कायमचे बंद, ४ महत्त्वाची कारणं आली समोर

या लाडक्या बहि‍णींना फक्त ५०० रूपये मिळणार -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना १५०० रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जातात. कारण, एकाचवेळी २ योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या महिलांना प्रत्येक महिन्याला फक्त ५०० रूपयांचाच लाभ दिला जातो.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

८० लाख लाडक्या बहिणी अपात्र - Ladki Bahin e-KYC verification update

ईकेवायसीनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ईकेवायसीनंतर राज्यातील पात्र महिलांची संख्या एक कोटी ६६ लाख इतकी झाली आहे. तर तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून त्यांचा १५०० रूपयांचा लाभ बंद झाला आहे.

Maharashtra Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : फक्त एका जिल्ह्यात एक लाख २१ हजार लाडक्या बहिणी अपात्र, कारणही आले समोर; पाहा ₹१५०० चा लाभ का झाला बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com