

Will TMC face a major split in West Bengal : महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये (uddhav thackeray and sharad pawar) उभी फूट पडली. त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आता आणखी एक पक्ष फुटण्याच्या तयारीत आहे. ममता बॅनर्जी यांचा टीएमसी (TMC) पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. टीएमसीचे ५० ते ६० आमदार ममता बॅनर्जींची साथ सोडणार असल्याचे समजतेय. गेल्या काही दिवसांपासून टीएमसीच्या अनेक नेत्यांनी राजीनामा दिलाय, काहींनी भाजपात प्रवेश केला आहे. पण आता टीएमसीमध्येच उभी फूट पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये अंतर्गत कलह वाढल्याचे चित्र आहे. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी २ आमदारांना काढून टाकले. पण त्याचवेळी राज्यभर अनेक नेत्यांच्या राजीनाम्याचा पूर आलाय. अनेक आमदार-खासदार टीएमसीच्या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवत आहे. त्यातच ५० आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे समजतेय. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
फेडरलिझम डेलीमधील एका वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडू शकते. कारण ५० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. २ आमदारांच्या हकालपट्टीनंतर विधानसभेतील टीएमसीचे संख्याबळ ७८ वर आले आहे. ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांच्या नेतृत्वाखाली नवीन तृणमूल काँग्रेसची स्थापना होऊ शकते, अशा अफवा आहेत. मात्र, यावर अद्याप कोणत्याही नेत्याने जाहीरपणे भाष्य केलेले नाही.
महाराष्ट्र पॅटर्न बंगालमध्ये?
टीएमसीचे ५० आमदार फुटून नवीन गट स्थापन केला, तर बंगालमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती होऊ शकते. एकनाथ शिंदे (आताचे उपमुख्यमंत्री) आणि त्यांचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गमावले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हेच झालं होतं. आता पश्चिम बंगालमध्ये काय होणार? याकडे देशाचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.